Join us

निर्देशांकांच्या तेजीचा सलग आठवा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 1:17 AM

जागतिक आणि भारतीय शेअर बाजारांमधील तेजी कायम असून निर्देशांकांच्या वाढीचा सलग आठवा सप्ताह पूर्ण झाला आहे.आगामी वर्षामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर अधिक राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज बाजाराच्या वाढीला हातभार लावणारा ठरला. बाजाराच्या संवेदनशील तसेच निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उंची गाठली.

- प्रसाद गो. जोशीजागतिक आणि भारतीय शेअर बाजारांमधील तेजी कायम असून निर्देशांकांच्या वाढीचा सलग आठवा सप्ताह पूर्ण झाला आहे.आगामी वर्षामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर अधिक राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज बाजाराच्या वाढीला हातभार लावणारा ठरला. बाजाराच्या संवेदनशील तसेच निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उंची गाठली.मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताह तेजीचाच राहिला. बाजारात केवळ चारच दिवस व्यवहार झाले. बाजार मागील बंद निर्देशांकाच्या वरच (३५६१३.९७) खुला झाला. त्यानंतर संवेदनशील निर्देशांक ३६२६८.१९ अशा नवीन उच्चांकावर पोहोचला. त्यानंतर तो थोडासा खाली येऊन ३६०५०.४४ अंशांवर स्थिरावला. सप्ताहामध्ये या निर्देशांकात ५३८.८६ अंशांची वाढ झाली आहे.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ही १७४.९५ अंशांनी वाढला आहे. सप्ताहाच्या अखेरीस तो ११०६९.६५ अंशांवर बंद झाला. बाजाराचा क्षेत्रीय निर्देशांक मिडकॅपमध्येही ७६.१९ अंशांनी वाढ होऊन तो १७८४१.१९ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांकाला मात्र विक्रीचा फटका बसल्याने हा निर्देशांक ११३.९८ अंशांनी घसरला.सन २०१८-१९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढण्याचा अंदाज आंतरराष्टÑीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे जागतिक अर्थव्यवस्थेमध्येही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. याचे सकारात्मक परिणाम बाजारातील वाढीमुळे दिसून आले.सरकारी बॅँकांना भांडवल पुरविण्याच्या सरकारच्या घोषणेनेही बाजाराला बळ दिले आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये सरकार निर्गुंतवणुकीचे ७२५०० कोटी रुपयांंचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची शक्यता दिसत आहे.देशातील विविध आस्थापनांचे तिमाही निकाल आशादायक येत असल्याने परकीय वित्तसंस्थांनी जानेवारी महिन्यात ३ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे.

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांक