नवी दिल्ली : सराफा बाजारात मंगळवारीही तेजी पाहायला मिळाली. सोने ९0 रुपयांनी वाढून २६,३१0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. सोने सलग नवव्या दिवशी महागले असून, जागतिक पातळीवरील भाववाढीचा लाभ सोन्याला मिळाला आहे.
सराफा बाजारातील सलग नऊ दिवसांची तेजी ही यंदाच्या वर्षातील सर्वांत दीर्घकाळ चाललेली तेजी ठरली आहे. चांदीला मात्र घसरणीचा सामना करावा लागला. चांदीचा भाव ४५0 रुपयांनी उतरून ३५,९५0 रुपये किलो झाला.
सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, वस्तू उत्पादन क्षेत्रातील कमजोर कलामुळे अमेरिकी फेडरल रिझर्व्हची पुढच्या महिन्यापासून होऊ घातलेली संभाव्य व्याजदर वाढ अशक्य झाली आहे. त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
गेल्या आठवड्यात चीनचा युआन घसरल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला बळकटी मिळाली आहे. सिंगापूरच्या बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव 0.२ टक्क्याने वाढून १,११९.८८ डॉलर प्रति औंस झाला. येथील भाववाढीचा परिणाम भारतीय बाजारांवरही झाला. याबरोबरच दागिने निर्मात्यांनी जोरदार खरेदी केल्यामुळे सोन्याचा भाव वाढला. काल केंद्र सरकारने सोन्यावरील आयात कर वाढवून १0 ग्रॅममागे ३६३ डॉलर केला. तसेच चांदीवरील आयात कर वाढवून किलोमागे ४९९ डॉलर केला. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यासाठी सोन्या-चांदीचे
आयात दर अनुक्रमे ३५४ डॉलर प्रति
१0 ग्रॅम आणि ४९८ डॉलर प्रति किलो होते.
तयार चांदीचा भाव ४५0 रुपयांनी घसरून ३५,९५0 रुपये किलो झाला आहे. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १५५ रुपयांनी घसरून ३५,७४५ रुपये किलो झाला आहे. चांदीच्या शिक्क्यांचा भाव मात्र खरेदीसाठी ५0 हजार रुपये आणि विक्रीसाठी ५१ हजार रुपये प्रति शेकडा असा स्थिर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सराफा बाजारात तेजीचा नववा दिवस
सराफा बाजारात मंगळवारीही तेजी पाहायला मिळाली. सोने ९0 रुपयांनी वाढून २६,३१0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. सोने सलग नवव्या दिवशी महागले असून
By admin | Published: August 18, 2015 10:09 PM2015-08-18T22:09:40+5:302015-08-18T22:09:40+5:30