नवी दिल्ली – जर तुम्हीही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवले असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला FD करण्यापूर्वी खूप विचार करून पैसे टाकावे लागतील. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं फिक्स्ड डिपॉझिटच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. जर तुम्हाला हे बदल माहिती नसतील तर तुम्हाला नाहक आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं.
FD च्या मॅच्युरिटी नियमांमध्ये बदल
आरबीआयनं(RBI) फिक्स्ड डिपॉझिट नियमात एक मोठा बदल केला तो म्हणजे आता मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही तुमच्या रक्कमेवर दावा केला नाही तर त्यावर तुम्हाला कमी व्याजदर मिळेल. हे व्याज सेव्हिंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजदरासमान असेल. आता बॅक्स ५ ते १० वर्षाच्या दिर्घकालीन फिक्स्ड डिपॉझिटवर ५ टक्क्याहून अधिक व्याज देते तर सेव्हिंग अकाऊंटला व्याजदर ३ ते ४ टक्क्याच्या आसपास असते.
RBI ने जारी केला नवीन आदेश
RBI ने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलंय की, जर फिक्स्ड डिपॉझिटची मॅच्युरिटी संपेल आणि त्या रक्कमेवर दावा केला नाही तर त्यावर सेव्हिंग अकाऊंटच्या हिशोबात व्याजदर किंवा मॅच्युर FD वर निर्धारित व्याजदर यापैकी जे कमी असेल ते दिलं जाईल. हा नियम व्यावसायिक, स्मॉल फायनेन्स बँक, सहकारी बँक आणि इतर स्थानिक बँकांना लागू करण्यात आला आहे.
जाणून घ्या काय आहेत नियम?
समजा, तुम्ही ५ वर्षाच्या कालावधीसाठी FD केली ती आज मॅच्युर होणार आहे. परंतु तुम्ही हे पैसे काढत नाही तर त्यावर दोन पर्याय होतील. जर FD वर मिळणारं व्याजदर त्या बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा कमी आहे. तर तुम्हाला FD चं व्याजदर मिळत राहील. परंतु FD वर मिळणारं व्याजदर हे सेव्हिंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सेव्हिंग अकाऊंटवर मिळणारं व्याजदरासह ती रक्कम दिली जाईल.
जुना नियम काय होता?
यापूर्वी जेव्हा तुमची FD मॅच्युर होत होती आणि जर तुम्ही पैसे काढले नाहीत अथवा त्यावर दावा केला नाही तर बँक तुमची FD त्याच कालावधीसाठी पुन्हा पुढे वाढवते. म्हणजे तुम्ही ५ वर्षासाठी FD केली होती तर बँक पुन्हा ५ वर्षासाठी FD वाढवते. परंतु आता असं होणार नाही. परंतु मॅच्युरिटीनंतर पैसे न काढल्यास त्यावर FD चं व्याजदर मिळणार नाही. त्यामुळे मॅच्युरिटी झाल्यानंतर तात्काळ पैसे काढण्यावर भर द्या अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं.