Join us

FD Rules Changed: रिझर्व्ह बँकेने एफडीच्या नियमात केला आहे मोठा बदल, त्वरित जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 5:25 PM

FD Rules Changed: जर तुम्हीही मुदत ठेवीमध्ये (FD) पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेनेच एफडीबाबतच्या नियमांमध्ये बदल केला आहे. तसेच नवे नियम लागूही झाले आहेत.

नवी दिल्ली - जर तुम्हीही मुदत ठेवीमध्ये (FD) पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेनेच एफडीबाबतच्या नियमांमध्ये बदल केला आहे. तसेच नवे नियम लागूही झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक सरकारी आणि बिगरसरकारी बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे एफडी करून घेण्यापूर्वी समजूतदारपणे निर्णय घेणे आवश्यक बनले आहे. जर तुम्हाला हे नियम माहिती नसतील तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.

रिझर्व्ह बँकेने फिक्स डिपॉझिटच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे. या बदललेल्या नियमानुसार जर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही रकमेबाबत क्लेम केला नाही तर तुम्हाला त्यावर कमी व्याज मिळेल. हे व्याज सेव्हिंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजाइतके असेल. सध्या बँका ५ ते १० वर्षांच्या दीर्घकालीन एफडीवर ५ टक्क्यांहून अधिक व्याज देतात. तर सेव्हिंग अकाऊंटवरील व्याजदर हे ३ ते ४ टक्क्यांच्या दरम्यान आहेत.

रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जर फिक्स डिपॉझिट मॅच्युअर झाले आणि रकमेचा भरणा होऊ शकला नाही, किंवा या रकमेवर दावा केला गेला नाही, तर त्यावर व्याजदर हा सेव्हिंग अकाऊंडच्या हिशेबाने किंवा मॅच्युअर एफडीवर निर्धारित व्याजदर यापैकी जे काही कमी असेल ते दिले जाईल. हा नवा नियम सर्व कर्शियल बँका, स्मॉल फायनान्स बँका, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील रकमेवर लागू होईल.

समजा तुम्ही पाच वर्षांची मॅच्युरिटी असलेली एफडी घेतली असेल, ती आज मॅच्युअर झालेली असेल, मात्र तुम्ही ही रक्कम काढली नाही तर दोन शक्यता निर्माण होतील. एक म्हणजे जर एफडीवर मिळत असलेले व्याज सेव्हिंग अकाऊंटवर मिळत असलेल्या व्याजापेक्षा कमी असेल तर तुम्हाला एफडीवरील व्याजच मिळत राहील. मात्र जर तुम्हाला एफडीवर मिळत असलेले व्याज हे सेव्हिंग अकाऊंटवर मिळत असलेल्या व्याजापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला सेव्हिंग अकाऊंटवर मिळणारे व्याज हे मॅच्युरिटीनंतर मिळेल.

याआधीच्या जुन्या नियमानुसार जर तुमची एफडी मॅच्युअर झाली आणि तुम्ही त्यातून पैसे काढले नाहीत तर बँक तुमच्या एफडीची मुदत वाढवायची. मात्र आता असं होणार नाही. तसेच मॅच्युरिटीवर पैसे काढले नाहीत तर त्यावर एफडीचं व्याज मिळणार नाही. त्यामुळे हाता एफडी मॅच्युअर झाल्यानंतर त्वरित पैसे काढणे हेच फायद्याचे ठरणार आहे.  

टॅग्स :गुंतवणूकपैसाभारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्र