Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनमध्ये एफडीआय १०३.७ अब्ज डॉलरवर

चीनमध्ये एफडीआय १०३.७ अब्ज डॉलरवर

चीनमध्ये यावर्षी आॅक्टोबरअखेर थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) ८.६ टक्क्यांनी वाढून १०३.७ अब्ज डॉलरपर्यंत गेली आहे.

By admin | Published: November 12, 2015 11:45 PM2015-11-12T23:45:54+5:302015-11-12T23:45:54+5:30

चीनमध्ये यावर्षी आॅक्टोबरअखेर थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) ८.६ टक्क्यांनी वाढून १०३.७ अब्ज डॉलरपर्यंत गेली आहे.

FDI in China is $ 103.7 billion | चीनमध्ये एफडीआय १०३.७ अब्ज डॉलरवर

चीनमध्ये एफडीआय १०३.७ अब्ज डॉलरवर

बीजिंग : चीनमध्ये यावर्षी आॅक्टोबरअखेर थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) ८.६ टक्क्यांनी वाढून १०३.७ अब्ज डॉलरपर्यंत गेली आहे. एकट्या आॅक्टोबरमध्ये थेट विदेशी गुंतवणूक ४.२ टक्क्यांनी वाढून ८.७७ अब्ज डॉलरची झाली.
शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले की, यंदा पहिले १० महिने आर्थिक क्षेत्र वगळता इतर सगळ्या क्षेत्रात एफडीआय गेल्या वर्षीच्या याच १० महिन्यांच्या तुलनेत ८.६ टक्क्यांनी वाढून १०३.७ अब्ज डॉलरची झाली. अतिउच्च तांत्रिक सेवा क्षेत्रात ५७.५ टक्के वाढ झाली.
एकूण सेवा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक १९.४ टक्क्यांनी वाढून ६.७६ अब्ज डॉलरची झाली. दुसरीकडे हायटेक निर्मिती क्षेत्रात जानेवारी ते आॅक्टोबर कालावधीत ७.५८ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आली. ही गुंतवणूक गेल्या वर्षीच्या तुलनेत ११.६ टक्क्यांनी जास्त आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: FDI in China is $ 103.7 billion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.