बीजिंग : चीनमध्ये यावर्षी आॅक्टोबरअखेर थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) ८.६ टक्क्यांनी वाढून १०३.७ अब्ज डॉलरपर्यंत गेली आहे. एकट्या आॅक्टोबरमध्ये थेट विदेशी गुंतवणूक ४.२ टक्क्यांनी वाढून ८.७७ अब्ज डॉलरची झाली.शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले की, यंदा पहिले १० महिने आर्थिक क्षेत्र वगळता इतर सगळ्या क्षेत्रात एफडीआय गेल्या वर्षीच्या याच १० महिन्यांच्या तुलनेत ८.६ टक्क्यांनी वाढून १०३.७ अब्ज डॉलरची झाली. अतिउच्च तांत्रिक सेवा क्षेत्रात ५७.५ टक्के वाढ झाली.
चीनमध्ये एफडीआय १०३.७ अब्ज डॉलरवर
By admin | Published: November 11, 2015 11:21 PM