Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोकऱ्यांवरही गदा येण्याची भीती!

नोकऱ्यांवरही गदा येण्याची भीती!

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये गेल्या सव्वा वर्षात झालेल्या घसरणीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना सुगीचे दिवस दिसण्यास सुरुवात झाली असली तरी, घसरलेल्या किंमतीमुळे

By admin | Published: January 13, 2016 03:23 AM2016-01-13T03:23:01+5:302016-01-13T03:23:01+5:30

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये गेल्या सव्वा वर्षात झालेल्या घसरणीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना सुगीचे दिवस दिसण्यास सुरुवात झाली असली तरी, घसरलेल्या किंमतीमुळे

Fear of coming mace at the jobs! | नोकऱ्यांवरही गदा येण्याची भीती!

नोकऱ्यांवरही गदा येण्याची भीती!

मुंबई : कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये गेल्या सव्वा वर्षात झालेल्या घसरणीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना सुगीचे दिवस दिसण्यास सुरुवात झाली असली तरी, घसरलेल्या किंमतीमुळे तेल उद्योगात मंदीचा शिरकाव झाला असून जगभरात सुमारे चार हजार लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. यामुळे तेल कंपन्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरलेले
आहे.
उपलब्ध माहितीनुसार, तेल क्षेत्रात जगात अग्रगण्य कंपनी असलेल्या ब्रिटीश पेट्रोलियम कंपनीने आतापर्यंत चार हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.
तेलाच्या दरातील घसरणीनंतर प्रथमच एका अग्रगण्य कंपनीने ही कारवाई केल्यानंतर आता अन्य कंपन्यांही त्याच मार्गाचा अवलंब करतील,अशी अटकळ बांधली जात आहे.
आगामी सहा महिन्यांत तेलाच्या या किमती किमान २० अमेरिकी डॉलरपर्यंत खाली घसरतील असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)

तेलाचे उत्पादन करणाऱ्या परदेशी कंपन्यांमध्ये मंदी पोहोचली असून तेलाच्या किमतीत जर आणखी किमान १० ते १२ डॉलर जरी घसरण झाली तरी आणखी किमान १६ हजार कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील असा अंदाज तेल अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

२०१४ च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनी प्रति बॅरल १४५ डॉलरची पातळी गाठत सर्वोच्चांकाला स्पर्श केला होता. त्यामुळे भारतासह अनेक देशांतून महागाईचा भडका उडाला होता. मात्र, सरत्या सव्वा ते दीड वर्षात तेलाच्या किमतीत लक्षणीय घसरण होत या किमती आता प्रति बॅरल ३० डॉलरच्या उंबरठ्यावर आल्या आहेत.

Web Title: Fear of coming mace at the jobs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.