Join us

पैशाचे प्रेम आणि आयकराची भीती!

By admin | Published: September 25, 2016 11:49 PM

प्रत्येकाला वाटते की, शांत, सुखी आणि आनंदाने जीवन जगावे. पैशाच्या प्रेमामुळे यामध्ये अडथळा निर्माण होतो. काहींना असे करूनही मन भरात नाही.

सी. ए. उमेश शर्मा आयडीएसमध्ये जावे...प्रत्येकाला वाटते की, शांत, सुखी आणि आनंदाने जीवन जगावे. पैशाच्या प्रेमामुळे यामध्ये अडथळा निर्माण होतो. काहींना असे करूनही मन भरात नाही. मग कधी तरी आयकराची भीती वाटते. ज्याला भीती दूर करावयाची आहे, त्याने आयडीएसमध्ये जावे. पैशाच्या प्रेमापेक्षा ज्याला शांत, सुखी आणि आनंदाच्या जीवनावर प्रेम आहे त्यांनीही आयडीएसमध्ये स्वेच्छेने जावे. अशाने पैशाचे प्रेम आणि आयकराची भीती दोन्हीही कमी होतील व याचा फायदा देशाच्या आर्थिक प्रगतीत होईल. या भरलेल्या कराचा उपयोग शासनाने उचित सुविधा देण्यात केला, तर पुढे कर न भरण्याची भावना कमी जनतेते होईल. अन्यथा भ्रष्टाचार व गैरसोईमुळे करदात्याच्या भावना दुखावतात. कायद्याच्या चुकांमुळेच आयडीएसचा जन्म झाला आहे. पुढे चांगले कायदे व त्याची समान अंमलबजावणी झाल्यास, अशा योजना जन्म घेणार नाहीत. आयडीएस हे कायद्याच्या व्यवस्थेचे अपयश आहे की, यश हे सूज्ञ माणसाने समजणे गरजेचे आहे. अर्जुन (काल्पनिक पात्र): कृष्णा, सध्या सर्वत्र आयकर विभागाचे सर्वे, धाडसत्र वगैरे चालू आहे. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, याचा उद्देश काय? याबद्दल माहिती सांगा.कृष्णा (काल्पनिक पात्र): अर्जुना, शासनाने काळा पैसा काढण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात ‘इन्कम डिक्लेरेशन स्कीम’ (आयडीएस) प्रणाली आणली, परंतु या स्कीमला करदात्यांचा प्रतिसाद खूप कमी मिळाला. त्यामुळे करदात्यांनी स्कीममध्ये भाग घेण्यासाठी अनेक ठिकाणी आयकर विभाग सर्वे, धाड करत आहे, तसेच आयकर अधिकारी डॉक्टर्स, काँट्रॅक्टर इत्यादींच्या मीटिंग घेऊन त्यांना आय. डी. एस. स्कीममध्ये इन्कम डिक्लेरेशन करावयास प्रवृत्त करत आहेत. या सर्व आयकर विभागाच्या कार्यवाहीमुळे आयकराची भीती करदात्यांमध्ये झाली आहे, परंतु करदात्यांच्या असलेल्या पैशाच्या प्रेमामुळे किंवा आयकराची भीती नाही, म्हणून ते आय. डी. एस. स्कीममध्ये काळा पैसा डिक्लेअर करत नाही व हा विरोधाभास निर्माण झाला आहे.अर्जुन : कृष्णा, प्रत्येक व्यक्तीला या काळ्या पैशाचे प्रेम का?कृष्णा : अर्जुना, बहुतांश लोकांनी दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमविलेले असतात. या मेहनतीच्या पैशाचा वाटा शासनाला देणे खूप अवघड जाते. दिवसेंदिवस प्रत्येकाच्या गरजा वाढत चालल्या आहेत. प्रत्येकाला कमविलेला पैसा कमी पडतो, म्हणून कर चुकवून कमविलेल्या पैशावर प्रत्येकाचे प्रेम असते, तसेच मीच का टॅक्स भरू, दुसरा कोणी नाही का? समाजात अशा अनेक प्रकारच्या गैरसमजुती आहेत. अनेकांना वाटते क ी, मला कोणी पाहत नाही, म्हणून मी ज्या मार्गाने पैसा कमवित आहे, ते बरोबर आहे. जसे कलियुगात ज्याचे उघडकीस आले, तो पापी आणि ज्याचे लपलेले आहे तो पुण्यात्मा! म्हणून कर चोरी धरली तर कर भरू, अन्यथा तो मी नव्हेच, अशी गत आहे.अर्जुन : कृष्णा, जे कायदा पालन करत आहेत, त्यांच्या मागेच शासन का आहे?कृष्णा : अर्जुना, आपला देश कृषिप्रधान आहे. आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या ७५ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहे. शेतीपासून मिळालेल्या उत्पन्नावर कर लागत नाही, तसेच उरलेल्या लोकसंख्येमधून फक्त ५ कोटी करदाते आहेत. त्यामुळे कर भरावयाचा भार या करदात्यांवर येतो व ज्याच्याकडे उत्पन्न आहे, त्याच्याच मागे शासन लागेल. जसे: ज्या झाडाला फळे जास्त आहेत, त्याला फळे तोडण्यासाठी दगड मारला जातो. अर्जुन : कृष्णा, करदात्यांना आयकर विभागाची भीती का?कृष्ण : अर्जुना, प्रत्येक करदात्याला रिटर्न भरणे गरजेचे आहे. रिटर्न दाखल केले नाही, तर दंड लागतो व रिटर्न भरले तर अचूक कर भरणे शासनाची अपेक्षा आहे, परंतु अनेकदा करदाता कर कमी भरण्यासाठी उत्पन्न दाखवत नाही. आयकर विभागाकडून सर्वे, धाड झाल्यास कर चुकवलेल्या संपत्ती उघड होईल, याची भीती करदात्याला नेहमीच असते. ही आयडीएसची शेवटची संधी आहे. नसता कारवाई कर चोरी करणाऱ्यावर पक्की असे पंतप्रधानांपासून ते आयकर अधिकारी सर्वच स्तरावरून म्हटले जात आहे. अनेक वर्तमानपत्रे, मासिक, टीव्ही, रेडिओ इत्यादीवरसुद्धा बॉम्ब फुटणार अशी जाहिरात होत आहे. आयकर अधिकाऱ्याला खूप अधिकार दिले आहेत कायद्यात, परंतु वेळेच्या अभावी, कामाच्या व्यापामुळे वा अशा अनेक कारणांमुळे कारवाई होत नाही. आता संगणकीकरण, पॅन, बँक, रजिस्टरी आॅफिस, गाड्या विक्रेते, दागिन्या व सोने खरेदी ५ लाखांच्या वर माहिती इ. अशा अनेक तरतुदीद्वारे करदात्याविषयी माहिती मिळत आहे. आयकर विभागात मिळत आहे. आज ना उद्या कारवाई होणे निश्चित, असे वाटते.अर्जुन: कृष्णा, काळ्या पैशाचे प्रेम व आयकराची भीती यामधून करदात्याने बाहेर कसे पडावे?कृष्ण : अर्जुना, शासनाची आय. डी. एस. या स्कीम करदात्यांनी भाग घ्यावा, अशी अपेक्षा होती, परंतु त्याला करदात्यांकडून कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे आयकर विभागाने सर्वे, मीटिंग घेऊन करदात्यांना चेतावणी देत आहेत. शासनाने प्रत्येक स्कीमध्ये भाग घेण्यासाठी करदात्यांची माहिती एकत्रित केली व या आधारे ते येणाऱ्या ते वसूल करणार आहे. म्हणून करदात्याने सतर्क होवून या शेवटच्या आठवड्यात काळा पैसा जाहीर करून आय. डी. एस. स्कीमध्ये भाग घेऊन शांती मिळवावी.अर्जुन : कृष्णा, या आयकरातील इन्कम डिक्लरेशन स्कीम काय आहे, ज्याने पैशावरील प्रेम वा आयकराची भीती कमी होईल?कृष्णा : अर्जुना, या स्कीमची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.१) जर दडविलेली रक्कम उघड करण्यासाठी या स्कीममध्ये अर्ज केला, तर दडविलेला उत्पन्नावर ३० टक्के आयकर, ७.५ टक्के सरचार्ज व ७.५ टक्के दंड असे एकूण ४५ टक्के कर भरावा लागेल.२) या स्कीममधील घोषित कोणतेही उत्पन्न किंवा या उत्पन्नातून गुंतवणूक संपत्तीमध्ये केली असेल, तर ती व त्याचे उत्पन्न आर्थिक वर्ष २०१५-१६ पर्यंतचे असावे, तसेच करदात्याने आयकर रिटर्न दाखल केलेले नसेल किंवा आयकर रिटर्नमध्ये हे उत्पन्न घेतले नसेल, तर या स्कीममध्ये जाता येईल.३) जर करपात्र उत्पन्न हे संपत्ती असेल, तर त्या संपत्तीचे मूल्य १ जून २०१६ च्या फेअर मार्केट व्हॅल्यूनुसार घ्यावे लागेल. या योजनेत जमीन, सोने, हिरे, मोती, दागिने, रोख इत्यादी जाहीर करता येतील.४) या स्कीममध्ये करदात्याला २५ टक्के ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत, ५० टक्के १ मार्च २०१७ आणि १०० टक्के ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत संपूर्ण टॅक्स भरावा लागेल, म्हणजेच वर्षभराचा वेळ दिलेला आहे.५) या स्कीमचा अर्जदार व त्याची माहिती गोपनीय राहील.