Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोलच्या किमती भडकण्याची भीती; मागणीत झाली मोठी वाढ

पेट्रोलच्या किमती भडकण्याची भीती; मागणीत झाली मोठी वाढ

मार्चमध्ये भारतातील इंधनाची मागणी तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. ९ एप्रिलपर्यंत इंधनाची मागणी १८.६२ दशलक्ष टनांनी (४.२ टक्के) वाढून १९.५६ दशलक्ष टन झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 07:24 AM2022-04-12T07:24:59+5:302022-04-12T07:25:16+5:30

मार्चमध्ये भारतातील इंधनाची मागणी तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. ९ एप्रिलपर्यंत इंधनाची मागणी १८.६२ दशलक्ष टनांनी (४.२ टक्के) वाढून १९.५६ दशलक्ष टन झाली आहे.

Fear of petrol prices hike There was a huge increase in demand | पेट्रोलच्या किमती भडकण्याची भीती; मागणीत झाली मोठी वाढ

पेट्रोलच्या किमती भडकण्याची भीती; मागणीत झाली मोठी वाढ

मुंबई :

मार्चमध्ये भारतातील इंधनाची मागणी तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. ९ एप्रिलपर्यंत इंधनाची मागणी १८.६२ दशलक्ष टनांनी (४.२ टक्के) वाढून १९.५६ दशलक्ष टन झाली आहे. ही मार्च २०१९ नंतरची सर्वाधिक वाढ आहे. मार्च २०१९ मध्ये इंधनाची मागणी १९.५६ दशलक्ष टन होती.
पेट्रोलच्या विक्रीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. आकडेवारीनुसार, मार्च २०२१ मध्ये पेट्रोलचा वापर २.७१ दशलक्ष टन होता, जो मार्च २०२२ मध्ये वाढून २.९१ दशलक्ष टन झाला आहे. तर मार्च २०२१ मध्ये ७.२२ दशलक्ष टन डिझेलची विक्री झाली होती, जी मार्च २०२२ मध्ये ७.७० दशलक्ष टन झाली.

अर्थव्यवस्था तेजीत
किमतीत वाढ होण्याच्या शक्यतेने मागणी वाढली असल्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. दरवाढीची शक्यता लक्षात घेऊन मार्चमध्ये अनेकांनी जास्त इंधन खरेदी केले. आता येत्या काही महिन्यांत अर्थव्यवस्था तेजीत असल्याने तेलाच्या मागणीत आणखी सुधारणा होण्याची 
शक्यता आहे.

Web Title: Fear of petrol prices hike There was a huge increase in demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.