सिंगापूर : तेल बाजारात अधिक पुरवठा होण्याच्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (आयईए) इशाऱ्यानंतर अमेरिकी खनिज तेलाचे भाव २८ डॉलर प्रति बॅरलपेक्षा खाली घसरले. तेलाच्या भावातील हा १२ वर्षांतील नीचांक आहे. तेल बाजारात वेगाने होणारा पुरवठा पाहता तेलाचा बाजार उद्ध्वस्त होण्याची शक्यता आयईएने वर्तविली आहे.
अमेरिकेचा बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट (डब्ल्यूटीआय) एक वेळ २७.५५ डॉलर प्रति बॅरल बोलला गेला. सप्टेंबर २00३ नंतर खनिज तेलाचा हा सर्वात कमी भाव आहे. डब्ल्यूटीआय खनिज तेलाचे भाव 0५00 ग्रिनीज प्रमाण वेळेला २७.६८ डॉलर प्रतिबॅरल बोलले गेले. हा मागील दिवसाच्या तुलनेत ७८ सेंट किंवा २.७४ टक्के खाली होता. यापूर्वी २३ सप्टेंबर २00३ रोजी डब्ल्यूटीआयचा दर २७.१३ डॉलर प्रति बॅरल होता.
यंदा मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने खनिज तेलाचे भाव आणखी घसरतील, असे आयईएने मंगळवारी जाहीर केले होते. निर्बंध उठविण्यात आल्याने तेलाच्या बाजारात इराणचा उदय झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या देशांनी तेल उत्पादनात केलेल्या थोड्याफार कपातीचा प्रभाव समाप्त झाला आहे.‘आईए’ने म्हटले आहे की, जोपर्यंत काही तरी खास बदल होत नाही, तोपर्यंत खनिज तेलाच्या बाजारात पुरवठा वाढतच राहील. त्यामुळे तेलाचे भाव आणखी घसरू शकतात.
इराणच्या राष्ट्रीय इटालियन तेल कंपनीने आपल्या तेलाचे उत्पादन पाच लाख बॅरल प्रतिदिनपर्यंत वाढविण्याचा आदेश दिला आहे. इराण सध्या २८ लाख बॅरल प्रतिदिन तेलाचे उत्पादन करतो, त्यातील १0 लाख बॅरल निर्यात केली जाते.
तेल बाजार उद्ध्वस्त होण्याची भीती
तेल बाजारात अधिक पुरवठा होण्याच्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (आयईए) इशाऱ्यानंतर अमेरिकी खनिज तेलाचे भाव २८ डॉलर प्रति बॅरलपेक्षा खाली घसरले.
By admin | Published: January 21, 2016 03:13 AM2016-01-21T03:13:44+5:302016-01-21T03:13:44+5:30