ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बंकेने व्याजदराढीचे संकेत दिल्याने सोमवारी संपूर्ण जगातील भांडवली बाजारावर परिणाम झाला असून भारतीय शेअर बाजारातही घसरणा पहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक सकाळच्या सत्रात तब्बल ५०० अंकांनी खाली कोसळून २८, २५१ वर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीही ८,७०० पातळी खाली पोहोचला. या घसरणीच्या सत्रामुळे आठवड्याचा सुरूवातीसच गुंतवणूकादारांमध्ये चिंतेचे वातावरण पहायला मिळाले.
फेडरल रिझर्व्हने व्याजदरांमध्ये वाढ केल्यास अमेरिकन अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळण्याची शक्यता आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अमेरिकेचे महत्त्वपूर्ण स्थान पाहता साहजिकच याचा विपरीत परिणाम जगभरातील अन्य देशांच्या अर्थव्यवस्थांवर होण्याची शक्यता आहे.
Sensex falls 447.89 points, is at 28,349.36— ANI (@ANI_news) September 12, 2016