Join us

'या' बँकेने आपल्या ग्राहकांना दिली मोठी भेट! आता FD'वर मिळणार जास्त व्याज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 8:36 PM

गेल्या काही दिवसापासून देशात महागाई सुरू आहे. या महागाईमध्ये बँकांनी कर्जावरील व्याजदर वाढवले आहेत.

गेल्या काही दिवसापासून देशात महागाई सुरू आहे. या महागाईमध्ये बँकांनी कर्जावरील व्याजदर वाढवले आहेत. आता खासगी क्षेत्रातील बँक फेडरल बँकेने मुदत ठेवींवर दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर या संदर्भात माहिती दिली आहे. 

नवे दर आजपासून लागू झाले आहेत. या बदलानंतर, बँक आता FD वर सर्वसामान्यांसाठी 3.00% ते 6.30% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50% ते 6.95% व्याज देत आहे. ही 7 दिवस ते 2223 दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीची FD आहे.

तवांग संघर्षानंतर 'या' सर्वेक्षणाने चीनला दिला धक्का! 58 टक्के भारतीयांनी टाकला बहिष्कार

बँक आता 7 दिवस ते 29 दिवसात परिपक्व होणाऱ्या FD वर 3.00 टक्के दराने व्याज देत आहे. 30 ते 4 दिवसांच्या कालावधीच्या FD वर 3.25 टक्के व्याजदर आहे. तसेच 46 दिवसांपासून ते 60 दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 4.00 टक्के व्याजदर असेल. तर, ६१ दिवसांपासून ते ९० दिवसांच्या एफडीवर ४.२५ टक्के दराने व्याज मिळेल.

फेडरल बँकेचा आता 91 दिवस ते 119 दिवसांचा कालावधी असलेल्या FD वर 4.50 टक्के व्याजदर आहे. तर 120 दिवस ते 180 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4.75 टक्के दराने व्याज मिळेल. बँकेचा 181 दिवस ते 270 दिवसांच्या कालावधीसह एफडीवर 5.75 टक्के व्याजदर असेल. दुसरीकडे, बँक 271 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधी पूर्ण होणाऱ्या FD वर 6.00 टक्के व्याज देत आहे.

बँक एक वर्ष ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 6.60 टक्के व्याज देत आहे. 18 महिने ते 2 वर्षांच्या मुदत ठेवींवर 7.25 टक्के व्याजदर आहे.

तसेच कॅनरा बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन दर उद्या 19 डिसेंबर 2022 पासून लागू होतील. बदलानंतर, कॅनरा बँकेने वेगवेगळ्या कालावधीत बँक एफडीचे दर 55 बेस पॉइंट्सपर्यंत वाढवले ​​आहेत. सर्वसामान्यांसाठी 3.25 ते 6.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.25 ते 7 टक्के व्याजदर उपलब्ध असतील. हे दर 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत.

टॅग्स :व्यवसायबँक