Join us

‘फेडरल’च्या निर्णयाने शेअर बाजाराला बळ

By admin | Published: September 19, 2015 1:44 AM

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरांत वाढ करण्याचा निर्णय तूर्त स्थगित ठेवल्याने भारतात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात होण्याची अपेक्षा वाढली आहे. याचा परिणाम म्हणून

मुंबई : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरांत वाढ करण्याचा निर्णय तूर्त स्थगित ठेवल्याने भारतात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात होण्याची अपेक्षा वाढली आहे. याचा परिणाम म्हणून शुक्रवारी शेअर बाजारात तेजी झळाळली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५५ अंकांनी वाढून २६,२१८.९१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ८,000 अंकांना स्पर्श केला.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी मजबुतीसह उघडला होता. त्यानंतर त्याने २६ हजार अंकांचा टप्पा पार केला. एका क्षणी तो २६,४७१.८२ अंकांपर्यंत झेपावला होता. बाजारात खरेदीचा जोर असतानाच नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे सेन्सेक्स थोडा खाली आला. तरीही सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स २६,२१८.९१ अंकांवर बंद झाला. २५४.९४ अंकांची अथवा 0.९८ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली.