Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता देशात खतांच्या किमती वाढण्याची शक्यता; जाणून घ्या, या मागील कारण...

आता देशात खतांच्या किमती वाढण्याची शक्यता; जाणून घ्या, या मागील कारण...

fertilizer rates : भारताच्या एकूण खत आयातीपैकी रशिया, युक्रेन आणि बेलारूसचा वाटा 10 ते 12 टक्के आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 04:14 PM2022-03-04T16:14:39+5:302022-03-04T16:15:24+5:30

fertilizer rates : भारताच्या एकूण खत आयातीपैकी रशिया, युक्रेन आणि बेलारूसचा वाटा 10 ते 12 टक्के आहे.

fertilizer rates are about to increase in india due to russia ukraine war | आता देशात खतांच्या किमती वाढण्याची शक्यता; जाणून घ्या, या मागील कारण...

आता देशात खतांच्या किमती वाढण्याची शक्यता; जाणून घ्या, या मागील कारण...

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम कृषी क्षेत्रावरही होऊ शकतो. देशात खतासाठी आता पूर्वीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. खतांच्या उत्पादनासाठी पोटॅश आवश्यक आहे आणि भारतात पोटॅश मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. रशिया आणि बेलारूस हे पोटॅशचे सर्वात मोठे निर्यातदार आहेत. मात्र, रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पोटॅशचा पुरवठा धोक्यात आला आहे. युक्रेन देखील पोटॅश निर्यात करतो.

भारताच्या एकूण खत आयातीपैकी रशिया, युक्रेन आणि बेलारूसचा वाटा 10 ते 12 टक्के आहे. या युद्धापूर्वी भारताने बेलारूसचे पोटॅश रशियाच्या बंदरांतून आणण्याची योजना आखली होती, परंतु निर्बंधांमुळे ही योजना धोक्यात आली आहे. याशिवाय, कॅनडासारखे इतर पोटॅश उत्पादक देश त्यांचे उत्पादन वाढवण्यास तयार नसल्याचे समजते. त्यामुळेच जागतिक बाजारपेठेत त्याचे भाव चढे आहेत. खताच्या चढ्या किमतीमुळे केंद्र सरकारला आणखी अनुदान द्यावे लागू शकते.

चालू आर्थिक वर्षात, पोटॅशची आयात सुमारे 280 डॉलर प्रति मेट्रिक टन दराने सुरू राहिली परंतु पुरवठ्याच्या संकटामुळे, त्याची किंमत प्रति मेट्रिक टन 500 ते 600 पर्यंत जाऊ शकते. इक्राचे संशोधन प्रमुख रोहित आहुजा म्हणाले की, रशिया आणि बेलारूसवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पुरवठा संकट आणखी वाढेल. शेतकऱ्यांना कमी दरात खते देण्यासाठी सरकारला आता आणखी अनुदान द्यावे लागणार आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा खत आयातीवर मोठा परिणाम दिसून येईल
रशिया-युक्रेन युद्धाचा खत आयातीवर मोठा परिणाम होणार आहे. पेमेंट आणि लॉजिस्टिक्स त्याच्या आयातीमध्ये अडथळा बनतील, असे क्रिसिल रेटिंगचे संचालक नितेश जैन म्हणाले. तसेच, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चच्या वरिष्ठ विश्लेषक पल्लवी भाटी यांनी सांगितले की, रशिया खतांचा मोठा निर्यातदार आहे, त्यामुळे आयात किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय युरिया उत्पादनासाठी लागणाऱ्या गॅसच्या किमतीतही वाढ झाली असून, त्याचाही परिणाम खताच्या किमतीवर होणार आहे.

Read in English

Web Title: fertilizer rates are about to increase in india due to russia ukraine war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.