Lokmat Money > बिझनेस न्यूज > खते क्षेत्रात ३४ टक्क्यांची वाढ

खते क्षेत्रात ३४ टक्क्यांची वाढ

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार असलेले कृषी क्षेत्र सकारात्मकरीत्या वाढत असल्याचे स्टेट बँकेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. बँकेने मंगळवारी देशाच्या उत्पादनावर आधारित ‘कम्पोझिट निर्देशांक’ अहवाल सादर केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 03:51 AM2017-12-28T03:51:15+5:302017-12-28T03:51:25+5:30

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार असलेले कृषी क्षेत्र सकारात्मकरीत्या वाढत असल्याचे स्टेट बँकेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. बँकेने मंगळवारी देशाच्या उत्पादनावर आधारित ‘कम्पोझिट निर्देशांक’ अहवाल सादर केला.

The fertilizer sector has increased by 34 percent | खते क्षेत्रात ३४ टक्क्यांची वाढ

खते क्षेत्रात ३४ टक्क्यांची वाढ

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार असलेले कृषी क्षेत्र सकारात्मकरीत्या वाढत असल्याचे स्टेट बँकेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. बँकेने मंगळवारी देशाच्या उत्पादनावर आधारित ‘कम्पोझिट निर्देशांक’ अहवाल सादर केला. त्यात शेतीशी संबंधित खते क्षेत्र ३४ टक्के वाढत असल्याचे समोर आले.
अहवालानुसार, डिसेंबरमध्ये उत्पादन क्षेत्रात नोव्हेंबरच्या तुलनेत किंचित वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये हा निर्देशांक ५३ होता. डिसेंबरमध्ये तो ५३.१ वर राहिला आहे. उत्पादन क्षेत्राचा विचार केल्यास, या क्षेत्राच्या विकासाचा वेग कमी असला, तरी देशातील वातावरण सकारात्मक आहे. खते हे त्यापैकीच एक क्षेत्र आहे. देशातील सर्व २६ खतनिर्मिती कंपन्या २०१८-१९च्या पहिल्या सहामाहीत करपूर्व व करानंतरही नफ्यात आहेत. या श्रेणीतील कंपन्या दोन ते ३४ टक्क्यांनी वाढत आहे.

Web Title: The fertilizer sector has increased by 34 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.