Join us  

सर्वात मोठी सरकारी बँक देतेय गृहकर्जावर व्याज सवलत; कसा घेऊ शकता लाभ? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 12:21 PM

Festive offer : SBI वर सामान्य गृहकर्जाचे व्याजदर 8.55 टक्के ते 9.05 टक्क्यांपर्यंत आहेत.

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात देशातील सर्वात मोठी सरकारी बँक ग्राहकांना गृहकर्जावर व्याजात सूट देत आहे. नवीन घर खरेदी करणारे ग्राहक 31 जानेवारी 2023 पर्यंत या सवलतीचा लाभ घेऊ शकतात. या ऑफरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) गृहकर्जावर 0.15 टक्के ते 0.30 टक्क्यांपर्यंत सवलत देत आहे. SBI वर सामान्य गृहकर्जाचे व्याजदर 8.55 टक्के ते 9.05 टक्क्यांपर्यंत आहेत.

SBI च्या फेस्टिव्ह कॅम्पेन ऑफर अंतर्गत व्याजदर 8.40 टक्के ते 9.05 टक्क्यांपर्यंत परवडणारे आहेत. SBI च्या नियमित आणि टॉप-अप गृहकर्जावर शून्य प्रक्रिया शुल्क (झिरो प्रोसेसिंग फी) देखील ऑफर सुरू आहे. मात्र, सर्वात कमी दर आणि परवडणाऱ्या ईएमआयचा (EMI) लाभ घेण्यासाठी चांगला सिबिल स्कोर असणे देखील खूप महत्वाचे आहे.

सिबिल स्कोअरच्या आधारे मिळेल सूट फेस्टिव्ह कॅम्पेन ऑफर अंतर्गत फ्लेक्स पे, अनिवासी भारतीय, पगारदार नसलेल्या नियमित गृहकर्जांसाठी बँक 800 पेक्षा जास्त किंवा योग्य सिबिल स्कोअर असलेल्या ग्राहकांना 8.40 टक्के व्याजदर देत आहे. हे सामान्य दर 8.55 टक्क्यांपेक्षा 0.15 टक्के कमी आहे. याशिवाय 750 ते 799 दरम्यान क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना 8.40 टक्के दराने गृहकर्ज दिले जात आहे, जे नियमित 8.65 टक्के व्याजदरापेक्षा 0.25 टक्के कमी आहे. याशिवाय, सिबिल स्कोअर 700 ते 749 वर 0.20 टक्के सवलत देऊन गृहकर्ज दिले जात आहे, जे नियमित 8.75 टक्क्यांच्या विरुद्ध 8.55 टक्के आहे.

अशा ग्राहकांना मिळणार नाही लाभबँक 1 ते 699 च्या खाली क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना गृहकर्जाच्या व्याजदरावर कोणतीही सवलत देत नाही. 650-600 दरम्यान क्रेडिट स्कोअर असलेल्या कर्जदारांसाठी गृहकर्जाचे व्याजदर 8.85 टक्के ते 9.05 टक्क्यांपर्यंत आहेत. या सणासुदीच्या हंगामासाठी, SBI ने आपल्या फ्लोअर रेट 8.55 टक्क्यांच्या ईबीआरच्या तुलनेत 15 बेसिस पॉईंटने कमी करून 8.40 टक्के केला आहे.

झिरो प्रोसेसिंग फीवर बँक देतेय सूटSBI चांगल्या क्रेडिट स्कोरअवर प्रॉपर्टीसाठी गृहकर्जावर 0.30 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. फेस्टिव्ह कॅम्पेनच्या दरम्यान नियमित आणि टॉप-अप गृहकर्जावर SBI  झिरो प्रोसेसिंग फी घेत आहे. यासोबतच बँकेने गृहकर्जासाठी 10,000 प्लस जीएसटीचा एक प्लॅट प्रोसेसिंग फी लागू केली आहे. याशिवाय, बँक या कॅम्पेन अंतर्गत इतर कोणतीही सूट देत नाही. 

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडियाबँक