Lokmat Money > बिझनेस न्यूज > संपत्तीतून फिटेल किंगफिशरचे कर्ज, मल्ल्याच्या कंपनीचा दावा

संपत्तीतून फिटेल किंगफिशरचे कर्ज, मल्ल्याच्या कंपनीचा दावा

बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या यूबी उद्योग समूहाची धारक कंपनी युनायटेड ब्रेवरिज होल्डिंगने (यूबीएचएल) कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की, आपल्या मालमत्ता व समभागांची बाजारातील किंमत १२,४०० कोटींपेक्षा जास्त असून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:50 AM2018-03-10T01:50:26+5:302018-03-10T01:50:26+5:30

बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या यूबी उद्योग समूहाची धारक कंपनी युनायटेड ब्रेवरिज होल्डिंगने (यूबीएचएल) कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की, आपल्या मालमत्ता व समभागांची बाजारातील किंमत १२,४०० कोटींपेक्षा जास्त असून...

Fidel Kingfisher loans from property, Mallya claims company | संपत्तीतून फिटेल किंगफिशरचे कर्ज, मल्ल्याच्या कंपनीचा दावा

संपत्तीतून फिटेल किंगफिशरचे कर्ज, मल्ल्याच्या कंपनीचा दावा

बंगळुरू - बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या यूबी उद्योग समूहाची धारक कंपनी युनायटेड ब्रेवरिज होल्डिंगने (यूबीएचएल) कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की, आपल्या मालमत्ता व समभागांची बाजारातील किंमत १२,४०० कोटींपेक्षा जास्त असून, त्यातून किंगफिशर एअरलाइन्सचे ६ हजार कोटी रुपयांचे कर्ज व्याजासह सहज फेडले जाऊ शकते.
किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्जाला यूबीएचएल हमीदार आहे. कंपनीने न्यायालयात सांगितले की, आदल्या सुनावणीवेळी न्यायालयाने कर्जफेडीचा प्रस्ताव अथवा अतिरिक्त ठेवींचा प्रस्ताव घेऊनच येण्याचे आदेश कंपनीला दिले होते. तथापि, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कंपनीच्या मालमत्ता आणि समभाग जप्त केल्यामुळे कंपनीच्या क्षमताच संपुष्टात आल्या आहेत. न्यायपीठाने या प्रकरणाची सुनावणी आता २ एप्रिलला ठेवली आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ सजन पोवय्या यांनी सांगितले की, जानेवारीमध्ये यूबीएचएलच्या मालमत्तांचे बाजार मूल्य १३,४०० कोटी रुपये होते. बाजारातील चढउतारामुळे ते १२,४०० कोटींवर आले आहे. तरीही किंगफिशर एअरलाइन्सवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी या मालमत्ता पुरेशा आहेत. कारण मुद्दल आणि व्याज मिळून कर्जाचा आकडा १० हजार कोटींपेक्षा मोठा नाही. (वृत्तसंस्था)

१,२८0 कोटी कोर्टात पडून

वकील उदय होल्ला यांनी सांगितले की, ईडीने सर्व काही जप्त केले आहे. कंपनीची १,२८० कोटींची रोख ठेव कर्नाटक उच्च न्यायालयात पडून आहे. त्यावर १३७ कोटी रुपयांचे व्याज मिळाल्यामुळे ठेवीची रक्कम आता १,४१७ कोटी झाली आहे. वकिलांच्या दाव्यावर उच्च न्यायालयाने म्हटले की, समभागांची किंमत अनिश्चित असल्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. कंपनीकडून समाधानकारक प्रस्ताव आला पाहिजे; तसेच तो पुढे जाता येईल, इतका ठोसही असायला हवा.

Web Title: Fidel Kingfisher loans from property, Mallya claims company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.