प्रसाद गो. जोशी
जागतिक शेअर बाजारांमधील सकारात्मक वातावरण, देशांतर्गत वित्तसंस्थांनी खरेदीमध्ये घेतलेला पुढाकार, विविध आस्थापनांचे अपेक्षेहून चांगले आलेले तिमाही निकाल अशा विविध कारणांनी भारतीय शेअर बाजारात गतसप्ताहामध्ये तेजी दिसून आली. सलग पाचव्या सप्ताहामध्ये बाजाराचे निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले. खनिज तेलाच्या वाढत्या किमती मात्र बाजाराला काहीसा घोर लावत आहेत.
मुंबई शेअर बाजारामध्ये सप्ताहाचा शुभारंभ वाढीव पातळीवर (३४४९३.६९ अंश) झाला. बुधवारचा अपवाद वगळता, बाजाराचा संवेदनशील निर्देशांक दररोज वाढीव पातळीवर बंद झाला. सप्ताहामध्ये हा निर्देशांक ३५०६५.३७ ते ३४२५९.२७ अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो ३४९६९.७० ृंअंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ५५४.१२ अंश म्हणजेच १.६ टक्क्यांनी वाढ झाली. राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ही १.२ टक्के म्हणजे १२७.८५ अंशांनी वाढून १०६९२.३० अंशांवर बंद झाला. बाजाराचे मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे क्षेत्रीय निर्देशांकही वाढलेले दिसून आले. मिडकॅप निर्देशांकामध्ये ११८.२४ अंशांची वाढ होऊन तो १६९१७.१८ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांकही १८२३९.९६ अंशांवर (साप्ताहिक वाढ ६१.९३ अंश) बंद झाला.
परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारामधील आपले विक्रीचे धोरण कायम राखले असले, तरी आगामी काळात या संस्था आक्रमक होण्याचे संकेत मिळत आहेत. फ्युचर्स आणि आॅप्शन्सच्या सौदापूर्तीमध्ये या संस्थांनी आक्रमकता दाखविली आहे. देशांतर्गत वित्तीय संस्थांनी मात्र आपले खरेदीचे धोरण कायम राखल्यानेच गतसप्ताहामध्ये बाजार वाढलेला दिसून आला. आस्थापनांचे आतापर्यंत जाहीर झालेले निकाल अपेक्षेहून चांगले आलेले असल्याने बाजाराने त्यांचे स्वागतच केलेले आहे. अॅक्सिस बॅँकेने मात्र तिमाहीमध्ये तोटा जाहीर केल्याने बाजारात नकारात्मक प्रतिक्रिया आली.
निर्देशांकांच्या वाढीचा सलग पाचवा सप्ताह
जागतिक शेअर बाजारांमधील सकारात्मक वातावरण, देशांतर्गत वित्तसंस्थांनी खरेदीमध्ये घेतलेला पुढाकार, विविध आस्थापनांचे अपेक्षेहून चांगले आलेले तिमाही निकाल अशा विविध कारणांनी भारतीय शेअर बाजारात गतसप्ताहामध्ये तेजी दिसून आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:38 AM2018-04-30T01:38:04+5:302018-04-30T01:38:04+5:30