बसमध्ये जागा पकडण्यावरुन, पकडलेली जागा मिळवण्यावरुन, सामान ठेवण्यावरुन होणारी भांडणं ही आता नवीन राहिली नाहीत. रुमाल टाकून जागा पडकल्यावरुनही अनेकदा बसमध्ये जोराची भांडणं झाली आहेत. काहीवेळा ही भांडणं मारहाणीपर्यंतही पोहोचल्याचं आपण पाहिलंय. पण, विमानात प्रवाशांची भांडणं, तेही मारहाणीपर्यंत हे ऐकायलाही नवलंच नाही का. उच्च विद्याविभूषित, उच्चवर्णीय वर्गच सहसा आंतरराष्ट्रीय विमानात प्रवास करत असतो. त्यामुळेच, विमानातील मारहाणीची ही घटनाही सोशल मीडियावर चर्चेत आहे.
बँकाँक येथून कोलकाता जाणाऱ्या विमानप्रवासात ही मारहाणीची घटना घडली. थाई स्माईल एअरवेजच्या विमानात या आठवड्यातच ही घटना घडली असून सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, काही प्रवासी एका व्यक्तीला सातत्याने चापट मारताना दिसून येतात. विमानातील एका भारतीय व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी विमान उड्डाण भरत असताना विमानतळावर ही घटना घडली. मारहाणीचं कारण अस्पष्ट आहे, मात्र विमानातील एअरहोस्टेस आणि इतर प्रवाशांनी एकत्र येऊन हे भांडण मिटवलं.
Bangkok To kolkata flight 😊🤨👇 pic.twitter.com/8KyqIcnUMX
— Munna _Yadav 💯%FB (@YadavMu91727055) December 28, 2022
व्हिडिओतील व्यक्तीला हात खाली करण्याचे सांगत कानाशिलात लगावण्यात येत आहे. विशेष म्हणजे या मारहाणी इतरही काही प्रवासी सहभागी झाल्याचं दिसून येतं. याप्रकरणी विमान नागरी उड्डाण सुरक्षा विभागाने दखल घेतली असून घटनेचा संपूर्ण तपशील मागितला आहे.