Join us

डिजिटल इंडियाद्वारे दलालांशी लढाई, पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 4:07 AM

आपण हाती घेतलेली डिजिटल इंडिया मोहीम म्हणजे दलाल आणि मध्यस्थांविरुद्धचे युद्धच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या मोहिमेमुळे काळा पैसा आणि काळा बाजार यांना आळा बसेल, तसेच छोटी शहरे आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होतील, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली  - आपण हाती घेतलेली डिजिटल इंडिया मोहीम म्हणजे दलाल आणि मध्यस्थांविरुद्धचे युद्धच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या मोहिमेमुळे काळा पैसा आणि काळा बाजार यांना आळा बसेल, तसेच छोटी शहरे आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होतील, असेही ते म्हणाले.मोदी यांनी शुक्रवारी ‘डिजिटल इंडिया’ पुढाकाराच्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉल सुविधेद्वारे थेट संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले की, भारतीयांनी विदेशी कंपन्यांची क्रेडिट/डेबिट कार्डे वापरण्याऐवजी स्वदेशी रूपेकार्ड वापरायला हवे. विदेशी कार्डावरील प्रोसेसिंग फी विदेशी कंपन्यांना मिळते. रुपे कार्ड वापरल्यामुळे हा पैसा भारतातच राहतो. तो विकासकामांसाठी वापरता येतो.मोदी म्हणाले की, मी डिजिटल पेमेंटबाबत पहिल्यांदा बोललो तेव्हा लोकांनी माझी खिल्ली उडविली होती.लोक उशाखाली पैसे ठेवत आणि दलांशिवाय रेशन मिळत नसे. आता मात्र या सेवा लोकांना थेट मिळत असल्याचे लाभधारकच सांगत आहेत. नकारात्मक विचार करणाऱ्यांसाठी हे चोख प्रत्युत्तरच आहे. डिजिटल साधनांचा वापर केल्यानंतर आपले पैसे सुरक्षित राहत नाहीत, अशा अफवा आता पसरविल्या जात आहेत. मी मध्यस्थांचे उच्चाटन केल्यामुळे अशी कारस्थाने केली जात आहेत. 

टॅग्स :नरेंद्र मोदीसरकारभारत