ुंडईची फ्ल्युडिक वर्ना दाखल
By admin | Published: February 20, 2015 01:10 AM2015-02-20T01:10:25+5:302015-02-20T01:10:25+5:30
>वाणिज्य बातमी .. १० बाय ३ ...फोटो आहे.. रॅपमध्ये ..कॅप्शन : फ्ल्युडिक वर्ना कारच्या दाखलीकरणाप्रसंगी कंपनीचे अधिकारी. - स्पीड, स्टाईलासह सुरक्षेत दमदार : इरोज ह्युंडईमध्ये प्रदर्शित नागपूर : स्पीड, स्टाईल, सोफॅस्टिकेशन, सेफ्टी या चार प्रकारात क्रांती करणारी ह्युंडईची नवीन ४ एस फ्ल्युडिक वर्ना ही वर्ल्ड सेदान कार इरोज ह्युंडई, घाट रोड येथे विक्रीसाठी नुकतीच दाखल करण्यात आली आहे.ह्युंडई वर्ना कार ६६ देशांमध्ये विकली जात असून जवळपास २३ लाख ग्राहक आहेत. नवीन कार मिड हाय सेदान वर्गवारीत आघाडीवर राहील, असा कंपनीला विश्वास आहे. स्पोर्टी, प्रीमियम डिझाईन, आरामदायक, अधिकाधिक इंधन क्षमता आदी बाबी ग्राहकांच्या अपेक्षेनुसार आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रात सवार्ेत्तम समजल्या जाणारी जागतिक दर्जाची सुरक्षेची उपकरणे नवीन ४एस फ्ल्युडिक वर्नामध्ये आहेत. याशिवाय स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजी आणि इंजिनीअरिंग हे एटर्ननल फ्ल्युडिक डिझाईनसह आहे. क्षमता आणि कुशलतेसह मॅन, नेचर व मशीनचे मिश्रण आहे. ही कार दोन पेट्रोल आणि दोन डिझेल इंजिनसह आहे. या कारमध्ये व्हीजीटी, व्हीटीव्हीटी आणि इलेक्ट्रॉनिक्स थ्रोटल कंट्रोल, डायमंड कोटिंगसह पिस्टन आहे. त्यामुळे कार अधिक दमदार आणि सक्षम झाली आहे. कारची अंतर्गत सजावटही हवीहवीशी आहे. समोरील आणि मागील सीट आकर्षक रंगाच्या आहेत. ड्रायव्हर सीटला खालीवर करण्याची सोय आहे. कप होल्डरसह रेअर सीट आर्म रेस्ट आहेत. टिल्ट व टेलिस्कोपिक स्टिअरिंग, १ जीबी इंटरनल मेमरी व सहा स्पीकरसह २डीन ब्लूटूथ ऑडिओ, रेन सेन्सिंग वायपर, रेअर पार्किंग सेन्सार, ऑटोमेटिक हेडलॅम्प आहेत. ही कार पेट्रोल व डिझेलमध्ये दहा प्रकारात आणि पाच आकर्षक रंगात विक्रीस आहे.