आयकर विभागाच्या माहितीनुसार करदात्यांना फायनान्शिअल इयर 2022-23 आणि असेसमेंट इयर 2023-24 साठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत संपली आहे. आयकर विभागानं आयटीआर दाखल केलेल्या लोकांना नियोजित तारखेपूर्वी त्यांचे आयटीआर व्हेरिफाय करण्याचं आवाहन केलंय. असं न केल्यास, आयटीआर अवैध मानला जाईल.
आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, 31 जुलैपर्यंत 6.77 कोटी पेक्षा जास्त ITR दाखल केले गेले आहेत. त्यापैकी 5.63 कोटी आयटीआर ई-व्हेरिफाय झाले आहेत. तर, एकूण व्हेरिफाय आयटीआर पैकी 3.44 कोटी पेक्षा जास्त म्हणजेच 61 टक्क्यांहून अधिक आयटीआर प्रोसेस करण्यात आलेत.
व्हेरिफाय नसल्यास अवैधआयकर विभागाने, आयटीआर दाखल केलेल्या करदात्यांना टॅक्स रिटर्न व्हेरिफाय करण्याचं आवाहन केलंय. आयटीआर व्हेरिफाय करणं म्हणजे उत्पन्नाबाबत दिलेले सर्व तपशील किंवा सर्व माहिती पूर्णपणे बरोबर आहेत याची खात्री करणं. आयटीआरची पडताळणी केल्यानंतर, आयकर विभाग पुढील प्रक्रियेसाठी ते प्रोसेस करतो.
लागू शकतो दंडआयकर नियमांनुसार, व्हेरिफाय न केलेले आयटीआर अवैध मानले जातात. अशा परिस्थितीत आयटीआर भरण्याचा काही उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत, करदात्यांना बिलेटेड आयटीआर भरावा लागेल, ज्यासाठी 5,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, आयटीआर ई-व्हेरिफाय करा.
आयटीआरची पडताळणी कशी होईल?
- आयकर विभागाने आयटीआर पडताळण्यासाठी करदात्यांना 6 पर्याय दिले आहेत.
- करदाते आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal/ ला भेट देऊन रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेल्या OTP द्वारे ई व्हेरिफाय पर्यायावर क्लिक करून व्हेरिफाय करू शकतात.
- करदाते बँक अकाऊंट जनरेटेड ईव्हिसीच्या माध्यमातूनही आयटीआर व्हेरिफाय करू शकतात.
- डीमॅट खात्याच्या मदतीने, ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया EVC द्वारे देखील पूर्ण केली जाऊ शकते.
- करदाते एटीएममधून ईव्हीसीद्वारे आयटीआर व्हेरिफाय करू शकतात.
- नेटबँकिंगच्या मदतीनंही करदात्यांना आयटीआर व्हेरिफाय करता येतो.
- आयटीआरचं ई-व्हेरिफिकेशन डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटद्वारेदेखील केलं जाऊ शकतं.