Lokmat Money > बिझनेस न्यूज > ४.६७ काेटींहून अधिक विवरणपत्रे दाखल; १.४९ लाख काेटींचा दिला परतावा

४.६७ काेटींहून अधिक विवरणपत्रे दाखल; १.४९ लाख काेटींचा दिला परतावा

Tax : प्राप्तिकर खात्याने याबाबत माहिती दिली. २७ डिसेंबरला एकाच दिवसात १५.४९ लाख विवरणपत्रे दाखल करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 05:33 AM2021-12-29T05:33:44+5:302021-12-29T05:34:19+5:30

Tax : प्राप्तिकर खात्याने याबाबत माहिती दिली. २७ डिसेंबरला एकाच दिवसात १५.४९ लाख विवरणपत्रे दाखल करण्यात आली.

Filed more than 4.67 statements; Return of Rs. 1.49 lakh | ४.६७ काेटींहून अधिक विवरणपत्रे दाखल; १.४९ लाख काेटींचा दिला परतावा

४.६७ काेटींहून अधिक विवरणपत्रे दाखल; १.४९ लाख काेटींचा दिला परतावा

नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी ३१ डिसेंबरही अंतिम मुदत असून २७ डिसेंबरपर्यंत ४.६७ काेटींहून अधिक विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत तर १.४९ लाख काेटी रुपयांचा प्राप्तिकर परतावा देण्यात आला आहे. 
प्राप्तिकर खात्याने याबाबत माहिती दिली. २७ डिसेंबरला एकाच दिवसात १५.४९ लाख विवरणपत्रे दाखल करण्यात आली. आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या विवरणपत्रांमध्ये २.५० काेटींहून अधिक वैयक्तिक आयटीआर-१ आणि १.१७ काेटींहून अधिक आयटीआर-४ दाखल करण्यात आले आहे. 
यावर्षी १.४५ कोटी करदात्यांना एकूण १.४९ लाख काेटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. त्यात आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी १.०७ काेटी करदात्यांना एकूण २१ हजार २१ काेटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे तर २ लाख १९ हजार कंपन्यांना ९८ हजार काेटी रुपयांचा कंपनी कराचा परतावा देण्यात आला आहे.

Web Title: Filed more than 4.67 statements; Return of Rs. 1.49 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.