Join us  

ई-इन्कमटॅक्स रिटर्न भरणे पूर्वीपेक्षाही सुलभ

By admin | Published: June 06, 2016 2:20 AM

इन्कमटॅक्स रिटर्न्स भरण्याच्या आॅनलाइन प्रणालीला अधिक उत्तेजन देण्याच्या हेतूने आयकर विभागाने शुक्रवारपासून नव्या योजनेचा प्रारंभ केला आहे.

नवी दिल्ली : इन्कमटॅक्स रिटर्न्स भरण्याच्या आॅनलाइन प्रणालीला अधिक उत्तेजन देण्याच्या हेतूने आयकर विभागाने शुक्रवारपासून नव्या योजनेचा प्रारंभ केला आहे. इंटरनेट सुविधा ज्यांना सहज उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी ई-आयकर रिटर्न एटीएम आधारित वैधता प्रणाली सुरू करण्यात आली. आॅनलाइन आयकर विवरणपत्रे (इन्कमटॅक्स रिटर्न्स) भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.आयकर विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवी सुविधा आयकर विभागाचे ई -फायलिंग पोर्टल ्रल्लूङ्मेी३ं७्रल्ल्िरंीा्र’्रल्लॅ.ॅङ्म५.्रल्ल वर उपलब्ध आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाने ही सुविधा शुक्रवारपासून सुरू केली असून, अन्य बँकांमध्येही ही सोय लवकरच उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा वापर करू इच्छिणाऱ्या करदात्याला त्याचे खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेच्या एटीएम कार्डच्या पूर्व वैधतेनुसार इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (ईव्हीसी) मिळेल. गतवर्षी आयकर विभागाने जो प्रयोग आधार कार्ड क्रमांकाच्या माध्यमातून सुरू केला होता, त्याच धर्तीवर करदात्याची ओळख पटवण्यासाठी हा वन टाइम पासवर्ड (डळढ) काम करील. (विशेष प्रतिनिधी)