मुंबई : सर्वसामान्य नागरिकांच्या पत पुरवठ्याच्या समस्या सोडविणा-या मायक्रो फायनान्स कंपन्यांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ही माहिती सहजपणे मिळवण्यासाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात आले आहे.
सर्वसामान्य नागरिकांना वेळोवेळी निधीची गरज भासते. त्याचप्रमाणे दरवेळेस बँकांकडून त्यासाठी कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. परंतु, आता सामान्यांची ही गरज मायक्रो फायनान्स कंपन्यांनी पूर्ण केली आहे. कमीत कमी दस्तावेजांच्या आधारे या कंपन्या कर्ज वितरण करतात. यामुळेच रिझर्व्ह बँकेनेदेखील त्यांना आता बिगर बँकिंग वित्तीय संस्थेचा (एनबीएफसी) दर्जा दिला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या कंपन्यांत ८० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत; पण या कंपन्यांचे काम छोट्या स्वरूपाचे आहे. यामुळेच त्यामधील कर्मचाºयांच्या नियमित वेतनासारख्या समस्या असतात. या समस्या सोडविण्यासाठीच ‘इक्विफॅक्स’ या ग्राहक पत मानांकन संस्थेने मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्स नेटवर्क (एमएनआयएन) हे विशेष पोर्टल सुरू केले आहे. देशभरातील सर्व मायक्रो फायनान्स संस्था, त्यामधील कर्मचारी, त्यांचे वेतन आदी सर्वच माहिती या पोर्टलवर आहे. दिल्लीत झालेल्या ‘भारत सर्वसमावेशक वित्त धोरण’ या परिषदेत प्रा. एम.एस. श्रीराम यांनी त्याचे उद्घाटन केले. रत्ना विश्वनाथन या एमएनआयएनच्या सीईओ आहेत. इक्विफॅक्सचे भारत प्रमुख के.एम. मणिय्या यावेळी उपस्थित होते.
फायनान्स कर्मचा-यांची माहिती एका क्लिकवर, ८० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत
सर्वसामान्य नागरिकांच्या पत पुरवठ्याच्या समस्या सोडविणा-या मायक्रो फायनान्स कंपन्यांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ही माहिती सहजपणे मिळवण्यासाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात आले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:29 PM2017-12-12T23:29:12+5:302017-12-12T23:29:38+5:30