नवी दिल्ली : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. बँकांची आर्थिक स्थिती व व्यवसायाच्या वृद्धीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकने शुक्रवारी जाहीर केलेल्या वित्तीय स्थिरता अहवालावरही बैठकीत चर्चा होईल.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी होत असलेली ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते. सीतारामन आगामी १ फेब्रुवारीला दुसरा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. त्याआधी त्या उद्योग तसेच व्यवसाय क्षेत्रातील मंडळींशी तसेच अर्थतज्ज्ञांशीही चर्चा करणार आहेत.