Lokmat Money > बिझनेस न्यूज > नाणेनिधीने चिनी वृद्धिदराचा अंदाज वाढवला, भारताचा स्थिर

नाणेनिधीने चिनी वृद्धिदराचा अंदाज वाढवला, भारताचा स्थिर

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आपल्या ताज्या अहवालात २0१६-१७ या वर्षासाठी भारताच्या वृद्धिदराचा अंदाज स्थिर ठेवला असून, चीनच्या वृद्धिदराचा

By admin | Published: May 4, 2016 02:18 AM2016-05-04T02:18:18+5:302016-05-04T02:18:18+5:30

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आपल्या ताज्या अहवालात २0१६-१७ या वर्षासाठी भारताच्या वृद्धिदराचा अंदाज स्थिर ठेवला असून, चीनच्या वृद्धिदराचा

The finance minister increased the Chinese incremental growth, India's stable | नाणेनिधीने चिनी वृद्धिदराचा अंदाज वाढवला, भारताचा स्थिर

नाणेनिधीने चिनी वृद्धिदराचा अंदाज वाढवला, भारताचा स्थिर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आपल्या ताज्या अहवालात २0१६-१७ या वर्षासाठी भारताच्या वृद्धिदराचा अंदाज स्थिर ठेवला असून, चीनच्या वृद्धिदराचा अंदाज मात्र वाढविला.
नाणेनिधीने मंगळवारी विभागीय आर्थिक पहिला अहवाल जारी केला. त्यात म्हटले की, २0१५ मध्ये ७.३ टक्के एवढ्या दराने वृद्धी केल्यानंतर यंदा व पुढील वर्षी भारताचा वृद्धिदर ७.५ टक्के राहील. नोव्हेंबरमध्ये जारी करण्यात आलेल्या अंदाजात बदल करताना चीनचा वृद्धिदर २0१६ मध्ये ६.५ टक्के आणि २0१७ मध्ये ६.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे की, २0१६ आणि २0१७ मध्ये भारताचा वृद्धिदर वाढून ७.५ टक्के होण्याचा अंदाज आहे. आर्थिक घडामोडींवर स्वस्त ऊर्जा आणि वाढत्या उत्पन्नामुळे खासगी खरेदीचे दडपण राहील. खासगी गुंतवणुकीत सुधारणेमुळे सुधारणांना बळ मिळेल. सार्वजनिक क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीने काही प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करता येईल, निर्यात घटल्याने अर्थव्यवस्थेवरील दबाव मात्र कायम राहील.
पुढील वर्षी देशातील चालू खात्यातील तूट वाढण्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या वर्षी चालू खात्यातील तूट वाढून १.३ टक्के झाली. त्यात यंदा वाढ होऊन १.५ टक्के आणि पुढील वर्षी २.१ टक्के होण्याची शक्यता आहे.
नाणेनिधीने या अहवालात भारतीय बँकांच्या वाढत्या थकीत कर्जावर चिंता व्यक्त केली आहे. संपूर्ण आशिया पॅसिफिक विभागात एनपीएत घट झाली असली, तरी भारतात मात्र हे प्रमाण जास्त आहे.

तेजी कायम राहील
नवीन वित्तीय वर्षाची शेअर बाजारात सुरुवात फार चांगली राहिली नसली, तरीही आशिया-पॅसिफिक क्षेत्रात भारताची तेजी कायम राहील, असे बाजाराचा अभ्यास करणाऱ्या आणि गुंतवणूक सल्लागार कंपनी गोल्डमॅन सॉक्सने म्हटले आहे. या कंपनीचे रणनीतिकार टिमोथी मोये म्हणाले की, ‘शेअर बाजारात चढ-उतार झाले, तरीही भारताचा वृद्धिदर मजबूत राहील.’

Web Title: The finance minister increased the Chinese incremental growth, India's stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.