Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'बँकांनी स्वत:आर्थिक संकटातून वाचवलं पाहिजे'; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्या सूचना

'बँकांनी स्वत:आर्थिक संकटातून वाचवलं पाहिजे'; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्या सूचना

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सूचना दिल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 07:56 PM2023-03-25T19:56:24+5:302023-03-25T19:56:56+5:30

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सूचना दिल्या.

finance minister meeting with bank chiefs said these things | 'बँकांनी स्वत:आर्थिक संकटातून वाचवलं पाहिजे'; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्या सूचना

'बँकांनी स्वत:आर्थिक संकटातून वाचवलं पाहिजे'; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्या सूचना

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना विविध आर्थिक पॅरामीटर्सचे मूल्यांकन करण्यास सांगितले आहे. जागतिक बँकिंग क्षेत्रात चढ-उतार सुरूच आहेत, त्या दरम्यान, अर्थमंत्र्यांनी हे पाऊल उचलले आहे. शनिवारी नवी दिल्लीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीनंतर वित्त मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात'बँकांना त्यांच्यासाठी असलेल्या अडचणी ओळखण्यास सांगण्यात आले आहे'.

बैठकीपूर्वी सरकारने या बँकांच्या बाँड पोर्टफोलिओचा तपशील मागवला होता. 'बँकांनी कोणत्याही संभाव्य आर्थिक जोखमीपासून स्वतःचे संरक्षण केले पाहिजे,अर्थमंत्र्यांनी बँकांच्या प्रमुखांना सांगितले. सर्व मॅक्रो आर्थिक मापदंड स्थिर आणि मजबूत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Old Pension Scheme: जुन्या पेन्शनबाबत मोदी सरकारची मोठी घोषणा! कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी आणणार 'हा' फॉर्म्युला

'भारतीय बँकांमध्ये यूएस बँकिंग क्षेत्रातील संकटामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही संभाव्य प्रतिकूल परिणामांना तोंड देण्याची क्षमता आहे, S&P ग्लोबल रेटिंग्सने या आठवड्यात सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री सीतारामन यांनीही बँकांना व्याजदराच्या जोखमीबद्दल सतर्क राहण्यास आणि नियमित तपासणी करण्यास सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एमडी आणि सीईओ यांच्यासोबत झालेल्या दोन तासांच्या बैठकीत सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँकेच्या अपयशादरम्यान जागतिक वातावरणावर खुली चर्चा झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. या बैठकीला वित्त राज्यमंत्री भगवान कराड, वित्त सेवा सचिव विवेक जोशी आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

याशिवाय अल्प आणि दीर्घकालीन अशा दोन्ही दृष्टिकोनातून येणाऱ्या जागतिक आर्थिक दबावाबाबतही अर्थमंत्र्यांनी चर्चा केली. बैठकीदरम्यान, सीतारामन यांनी यावर भर दिला की बँकांनी तपशीलवार चर्चा केली पाहिजे आणि नियामक फ्रेमवर्कचे पालन केले पाहिजे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, बँकांनी त्यांच्या व्यवसाय मॉडेलकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून ते कोणत्याही प्रकारची जोखीम ओळखू शकतील, असंही सांगण्यात आले आहे.

Web Title: finance minister meeting with bank chiefs said these things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.