Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतंय - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतंय - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

देशातील महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढत आहे. त्यामुळे सरकारने महागाई कशी नियंत्रणात आणता येईल, याची योजना आखली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 06:08 PM2023-05-06T18:08:54+5:302023-05-06T21:18:38+5:30

देशातील महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढत आहे. त्यामुळे सरकारने महागाई कशी नियंत्रणात आणता येईल, याची योजना आखली आहे.

finance minister nirmala sitaraman said indian is working on controlling inflation | महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतंय - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतंय - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. यादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे विधान समोर आले आहे. त्या म्हणाल्या की, "देशातील महागाई आपल्या टॉलरेंसच्या लेव्हलपेक्षा किंचित वर आहे. अशात महागाईवर नियंत्रित ठेवले जाऊ शकते. सध्या तरी महागाईमुळे एवढे मोठे नुकसान झालेले नाही. त्यामुळेच सरकार आणि देश दोघेही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत."

दरम्यान, देशातील महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढत आहे. त्यामुळे सरकारने महागाई कशी नियंत्रणात आणता येईल, याची योजना आखली आहे. अशा परिस्थितीत लवकरच सर्वसामान्यांना वाढत्या महागाईतून दिलासा मिळेल, अशी शक्यता वर्तविली जाऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितले की, भारतातील महागाई आपल्या टॉलरेंसच्या लेव्हलपेक्षा वर आहे. अशात महागाई नियंत्रित केले जाऊ शकते. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.

याचबरोबर, निर्मला सीतारामन म्हणाल्या की, "आम्ही अत्यंत मोजक्या पद्धतीने काम केले आहे. ज्याचा परिणाम असा आहे की, आज देशाची महागाई हागाई आपल्या टॉलरेंसच्या लेव्हलपेक्षा थोडी वर आहे. मात्र, तरीही फारसे काही चुकले नाही. ही महागाई लेव्हल खाली आणली जाऊ शकते आणि ती नियंत्रित देखील केली जाऊ शकते." दरम्यान, भारताची मार्चसाठी वार्षिक किरकोळ चलनवाढ जवळपास 15 महिन्यांतील सर्वात कमी वेगाने वाढली आहे आणि ती टॉलरेंसच्या लेव्हलपेक्षा अगदी वर आहे.

Web Title: finance minister nirmala sitaraman said indian is working on controlling inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.