Join us  

इन्कम टॅक्स रिर्टन भरणाऱ्यांसाठी वित्त मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय, ITR भरण्यासाठी दिली मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 4:23 PM

Income Tax Return Update: वित्त मंत्रालयाने इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठीच्या अंतिम तारखेची मुदत पुन्हा वाढवून ती ७ नोव्हेंबर केली आहे.

नवी दिल्ली - प्राप्तीकर भरणाऱ्यांना इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणे अनिवार्य आहे. सरकारकडून आयटीआर भरण्यासाठीची डेडलाइन वारंवार प्रसिद्ध केली जात असते. त्या मुदतीत इन्कम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक असते. मात्र अनेकजण या निर्धारित वेळेपर्यंत आपला आयटीआर भरू शकत नाहीत. त्यानंतर त्यांच्याकडून दंडासह आयटीआर वसूल केला जातो. दरम्यान, वित्त मंत्रालयाने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीची मुदत वाढवली आहे.

वित्त मंत्रालयाने इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठीच्या अंतिम तारखेची मुदत पुन्हा वाढवून ती ७ नोव्हेंबर केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड सीबीडीटीने एका नोटिफिकेशनमध्ये सांगितले की, गेल्या महिन्यामध्ये ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुदत वाढवण्यात आली होती. त्यासाठी आयटीआर दाखल करण्याची मुदतसुद्धा वाढवण्यात आली आहे. सीबीडीटीने सांगितले की, आर्थिक वर्ष २०२२-२३साठी अधिनियमातील कलम १३९ च्या पोटकलम (१) अन्वये उत्पन्नाची माहिती देण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आधी ही मुदत ३१ ऑक्टोबर होती. मात्र आता ती वाढवून ७ नोव्हेंबर अशी करण्यात आली आहे.

सीबीडीटीने फॉर्म १०ए भरण्यासाठीची मुदतही २५ नोव्हंबर २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी हा फॉर्म ३० सप्टेंबरपर्यंत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भरावा लागेल असे सांगण्यात आले होते.  करदात्यांच्या गजरा लक्षाच घेऊन फॉर्म १०ए भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२साठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ होती. ज्या करदात्यांच्या खात्यांचं ऑडिट करण्याची गजर नाही, अशांनी या तारखेपर्यंत आयटीआर फाईल करणे आवश्यक होते. ज्या करदात्यांनी ३१ जुलैपर्यंत आयटीआर दाखल केलेला नाही त्यांना ५ हजार रुपये लेट फि द्यावी लागेल.  

टॅग्स :इन्कम टॅक्सकरपैसा