Join us

महासत्तेत आर्थिक कोंडी : सरकारचे कामकाज ठप्प, सात लाख कर्मचारी सध्या बसले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:49 AM

अमेरिका सरकार पुन्हा एकदा आर्थिक संकटात आहे. पाच वर्षात दुस-यांदा शटडाउन झाल्याने जगावर चिंतेची छाया पसरली आहे. याचा भारतालाही मोठा झटका लागला आहे.

नवी दिल्ली : अमेरिका सरकार पुन्हा एकदा आर्थिक संकटात आहे. पाच वर्षात दुस-यांदा शटडाउन झाल्याने जगावर चिंतेची छाया पसरली आहे. याचा भारतालाही मोठा झटका लागला आहे. कारण, याचा परिणाम थेट दोन्ही देशांच्या व्यवसायांवर होणार आहे. अमेरिकेतील सरकार ठप्प झाल्याने देशातील निर्यात प्रभावित होणार आहे. महासत्तेतील या आर्थिक कोंडीमुळे कामकाज ठप्प पडले असून, सरकारी कार्यालयांतील सुमारे सात लाख कर्मचारी घरी बसले आहेत.सरकारी खर्चाच्या एका विधेयकाला सिनेट सदस्यांनी मंजुरी न दिल्याने, ट्रम्प प्रशासन व सरकारवर शटडाउनची वेळ आली आहे. खर्चाच्या विधेयकाला मंजुरी न मिळाल्याने अमेरिकेतील अनेक सरकारी विभाग ठप्प पडण्याची वेळ आली आहे. अर्थात, अमेरिकेत अँटी डिफिशिएंसी अ‍ॅक्ट लागू आहे, ज्यामुळे फंड कमी असल्यास कामकाज रोखले जाते. दुसरीकडे सरकार ही कमतरता दूर करण्यासाठी एक अल्पकाळातील खर्चाचे विधेयक आणते. अमेरिका सरकारच्या प्रतिनिधी मंडळासोबत सिनेट सदस्यांचीही त्याला मान्यता लागते. प्रतिनिधी मंडळाने हे बिल मंजूर केले, पण सिनेटने मंजुरी न दिल्याने हे संकट उभे ठाकले आहे.इंजिनीअरिंग एक्सपर्ट प्रमोशन कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष रवि पी. सहगल यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकी सरकार ठप्प झाल्याचे वृत्त निश्चितपणे भारतीय निर्यातकांसाठी नकारात्मक वृत्त आहे. कारण देशातून सर्वाधिक निर्यात केल्या जाणाºया अर्थव्यवस्थेत अमेरिका प्रमुख आहे. इंजिनीअरिंग क्षेत्रासाठी अमेरिका नंबर १ निर्यात ठिकाण आहे. सद्याच्या आर्थिक वर्षात यात अधिक मजबूत वाढ पाहायला मिळणार आहे.सहगल यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या काळात अमेरिकेला करण्यात येणाºया इंजिनीअरिंग निर्यातीत ५० टक्केपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यांनी काळजी व्यक्त करत म्हटले आहे की, अमेरिकेच्या वाणिज्य आणि परिवहन विभागाचे ६० हजारांपेक्षा अधिक कर्मचाºयांना या काळात सुट्टीवर पाठविण्यात येईल. यामुळे बंदरावरील कामकाज विस्कळीत होऊ शकते.या क्षेत्रातील तज्ज्ञ अंबरीश बालिगा म्हणाले की, जर हा प्रश्न लवकर सुटला, तर भारतीय बाजारावर याचा परिणाम होणार नाही, पण सोमवार, मंगळवारपर्यंत जर हे संकट कायम राहिले, तर भारतासह जागतिक बाजारपेठ प्रभावित होईल.उड्डाणांवर परिणाम -अमेरिकी सरकारच्या शटडाउनमुळे जगावर परिणाम होत असताना, भारतातून अमेरिकेला जाणारे कोणतेही विमान उड्डाण रद्द करण्यात आले नाही. प्रवाशांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. यात्रा डॉट कॉमचे मुख्य परिचालन अधिकारी शरत धल यांनी सांगितले की, अमेरिकेत आगामी काळात प्रवास करण्याचा विचार करणाºयांवर याचा प्रभाव पडू शकतो, तसेच व्हिसा प्रोसेसिंगमध्येही वेळ लागू शकतो. भारत वा अन्य देशांचा दौरा करणाºया अमेरिकी नागरिकांच्या पासपोर्ट प्रोसेसिंगमध्येही वेळ लागू शकतो.

टॅग्स :अमेरिका