Lokmat Money > बिझनेस न्यूज > जादुई फॉर्म्युला; पैसे दुप्पट-तिप्पट कधी होणार?... एका मिनिटात कळणार!

जादुई फॉर्म्युला; पैसे दुप्पट-तिप्पट कधी होणार?... एका मिनिटात कळणार!

पैसे कसे दुप्पट आणि तिप्पट होतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 04:30 PM2018-11-21T16:30:55+5:302018-11-21T16:31:06+5:30

पैसे कसे दुप्पट आणि तिप्पट होतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

financial planning thumb rule investment tip double your money | जादुई फॉर्म्युला; पैसे दुप्पट-तिप्पट कधी होणार?... एका मिनिटात कळणार!

जादुई फॉर्म्युला; पैसे दुप्पट-तिप्पट कधी होणार?... एका मिनिटात कळणार!

नवी दिल्ली- आपल्याला जर वजन कमी करायचं असल्यास कमी खाणं आणि त्याचं बरोबर जास्त व्यायाम करण्याचा आपण प्रयत्न करतो. पैशाच्या बाबतीतही काहीसं असंच असतं. पैसे कमी खर्च करा अन् जास्त बचत करा, जेणेकरून तुमचं सेव्हिंग राहील. बरेच जण निवृत्तीनंतर पैशांची गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे काही वर्षांत तुमचे पैसे दुप्पट आणि तिप्पट होतात. परंतु हे पैसे कसे दुप्पट आणि तिप्पट होतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • काय आहे नियम 72- तुमचे पैसे कसे दुप्पट होतात, यासाठी एक नियम प्रचलित आहे. हा नियम 72 आहे. व्यवसायात याचा सर्रास वापर केला जातो. नियम 72नुसार तुम्ही गुंतवलेले पैसे कोणत्या मर्यादेपर्यंत दुप्पट होतील हे तुम्हाला समजणार आहे. 
  • उदा. समजा तुम्ही एसबीआयच्या एका योजनेत गुंतवणूक केली आहे आणि ती तुम्ही 7 टक्के व्याजानं दिली आहे. अशात नियम 72नुसार 72ला तुम्हाला 2नं भागावं लागणार आहे. 72/2= 10.28 वर्षं, म्हणजे या योजनेत तुमचे पैसे 10.28 वर्षांत दुप्पट होणार आहेत. 
  • किती वर्षांत होणार पैसे तिप्पट
  • नियम 114- नियम 114नुसार किती वर्षात तुमचा पैसा तिप्पट होणार आहे हे समजणार आहे. त्यासाठी 114नुसार तुम्हाला व्याजाला भागावं लागणार आहे. 
  • उदा. जर तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवणूक करताय आणि त्या योजनेवर तुम्हाला 8 टक्के व्याज मिळते. तर 114/8= 14.25 वर्षं, मग या योजनेत गुंतवलेले पैसे 14.28 वर्षांत तिप्पट होणार आहे.  
  • किती वर्षात होतील चारपट पैसा
  • नियम 144- नियम 144नुसार तुम्हाला पैसा कधी चार पट होईल हे समजणार आहे. 
  • उदा. तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशावर 8 टक्के व्याज मिळतंय. तर 18 वर्षांत तुमचा तो पैसा चारपट होणार आहे. 144/8= 18 वर्षं

Web Title: financial planning thumb rule investment tip double your money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा