Join us  

Financial Planning Tips : तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करायचे आहेत का? मग ७२, १४४ आणि ११४ फॉर्म्युला वापरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:43 PM

Financial Planning Tips : आर्थिक शिस्त आणि आपल्या गुंतवणूकीतील परतावा जाणून घेण्यासाठी ७२, ११४ आणि १४४ चे नियम तुमचं काम सोपं करतील.

Financial Planning Tips : तुम्ही नोकरी करत असा की व्यवसाय, महिन्याकाठी तुमच्याकडे किती पैसे येतात याला महत्त्व नाही. तुम्ही त्या पैशांचं नियोजन कसे करता? यावर तुमची आर्थिक प्रगती अवलंबून आहे. आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी फक्त पैसे कमावून उपयोग नाही. तर तुमच्यात आर्थिक शिस्त असणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीतून आपले पैसे दुप्पट/तिप्पट व्हावेत असं आपल्याला वाटत असतं. यासाठी गुंतवणुकीचे काही नियम पाळणे आवश्यक आहे. हे नियम ७२,११४ आणि १४४ आहेत. हे आकडे तुमचे पैसे किती दिवसांत दुप्पट/तिप्पट होतील हे सांगण्यास मदत करतात.

काय सांगतो ७२ चा नियमगुंतवणुकीच्या पर्यायामध्ये तुमचे पैसे कधी दुप्पट होतील हे हा नियम सांगतो. ७२ चा नियम समजून घेण्यासाठी, तुम्ही अपेक्षित वार्षिक परताव्याच्या दराला ७२ ने भागलं पाहिजे. उदाहरणार्थ, ८ टक्के वार्षित परतावा देणाऱ्या योजनेत तुम्ही १ लाख रुपये गुंतवले आहेत. आता ७२ ला ८ ने भागल्यास ९ उत्तर येईल. याचा अर्थ या गुंतवणुकीत तुमचे १ लाखाचे २ लाख रुपये होण्यासाठी ९ वर्षे लागतील.

११४ चा नियमतुमची गुंतवणूक तिप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी नियम ११४ वापरल्यानंतर समजतो. या नियमात तुम्हाला ७२ ऐवजी ११४ वापरावे लागतील. उदाहरणार्थ, जर एखादी गुंतवणूक तुम्हाला १० टक्के वार्षिक परतावा देत असेल, तर तुमचे पैसे तिप्पट होण्यासाठी ११४/१० = ११.४ वर्षे लागतील. अशा प्रकारे, या गुंतवणुकीत तुमचे पैसे तिप्पट होण्यासाठी ११.४ वर्षे लागतील.

नियम १४४ काय आहे?नियम १४४ वापरून, आपली गुंतवणूक चौपट होण्यासाठी किती वेळ लागेल हे आपण शोधू शकतो. यासाठी तुम्हाला फॉर्म्युलामध्ये ७२ ऐवजी १४४ ठेवावे लागतील. एखाद्या गुंतवणुकीप्रमाणे तुम्हाला १२ टक्के वार्षिक परतावा मिळत असेल. तर, या गुंतवणुकीत तुमची रक्कम चौपट होण्यासाठी १४४/१२= १२ वर्षे लागतील. इतक्या वर्षांत तुमची गुंतवणूक ४ पटीने वाढवण्यासाठी वार्षिक परताव्याची किती टक्केवारी लागेल हे शोधण्यासाठी तुम्ही या सूत्राचा उलट वापरही करू शकता.

टॅग्स :गुंतवणूकपैसा