युवावस्थेमध्ये कमाई सुरु झाली की फार उत्साह असतो. पण पैसे हाताळणे समजायला वेळ लागतो. त्यामुळे अनेकांना हे महागात पडतं. मजा-मस्ती करणे गरजेचेच आहे. आवडत्या वस्तू घेणेही गरजेचे आहे. पण वेळीच पैशांचं योग्य नियोजन केलं नाही तर तुमच्या कमाईला फार महत्व राहणार नाही. त्यामुळे आधीच काही उपाययोजना केल्या तर तुम्हाला याची मदत होईलच.
बॅंक अकाऊंटवर ठेवा लक्ष
याची सुरुवात तुम्ही तुमच्या बॅंक अकाऊंटपासून करा. एक मुख्य अकाऊंट तुमच्या इन्कमसाठी ठेवा. ज्याचा वापर तुम्ही तुमचं फायनॅन्शिअल स्टेटससाठी करु शकता. बॅक अकाऊंटकडे तुम्ही सुविधा म्हणून नाही तर फायनॅन्शिअल लाइफ रेकॉर्डच्या रुपात बघा.
इन्कम आणि खर्चात बॅलन्स
आपल्या खर्चांना तुम्ही टक्केवारीच्या रुपात बघायला सुरुवात करा. जनरली तुमचा खर्च तुमच्या इन्कमच्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. खर्च जितका कमी होईल तितका तुमचा फायदा होईल. बाकी ४० टक्के भाग बचत आणि तुमच्या आवडीसाठी ठेवू शकता.
उधार घेणे बंद करा
कमाई आणि खर्च याबाबत एक कम्फर्ट लेव्हलपर्यंत पोहोचेपर्यंत आणि पुढचा पगार होईपर्यंत बॅक अकाऊंटमध्ये पैसे असेपर्यंत उधार पैसे घेणे टाळा. तुमची बॅक तुम्हाला क्रेडिट कार्ड ऑफर करत असेल तरी सुद्धा खात्यात बऱ्यापैकी रक्कम स्थिर होईपर्यंत केवळ डेबिट कार्डचा वापर करा.
क्रेडिट हिस्ट्री ठेवा योग्य
आपल्या क्रेडिट हिस्ट्रीला योग्य ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही एज्युकेशन लोन घेतलं असेल ते आधी फेडण्याचा विचार करा. जर त्यात तुम्हाला अडचण असेल तर पालकांकडून आणि मित्रांकडून मदत घ्या. किंवा बॅकेला लोनच्या नियमांमध्ये बदल करण्याची विनंती करा.
आधी बचत मग खर्च
बचतला डिफॉल्ट मोडमध्ये टाका. जर तुम्ही खर्च केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या रकमेची बचत करण्याचा विचार करत असाल तर असेही होऊ शकते की, तुमच्याकडे काहीच शिल्लक राहू नये. यासाठी तुम्ही पीपीएफ अकाऊंटमध्ये महिन्याला पैसे जमा करु शकता. किंवा म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू शकता. हे केल्यावर जे पैसे शिल्लक राहतात त्यातून तुमचे खर्च भागवा.
इमरजन्सी फंड
अचानक येणाऱ्या गरजांसाठी फंडची सोय लावा. तरुणांना यासाठी बजेट वेगळं काढणे कठिण असते. यासाठी कोणत्याही बॅक एफडीमध्ये रक्कम ठेवा. गरज पडली तर त्या डिपॉझिटवर एक लोन घ्या. जेणेकरुन तुम्ही लोन फेडण्यासाठी बांधिल व्हाल आणि ती एफडी पुन्हा तयार होईल.