रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीच्या बैठकीत या वेळीही रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दरात शेवटची वाढ करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात वाढ न केल्यामुळे बँक मुदत ठेवींच्या (FD Interest Rate) व्याजदरात सध्या मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. परंतु, तरीही तुम्हाला एफडीवर चांगलं व्याज मिळण्याची संधी आहे. स्मॉल फायनान्स सेक्टरमधील फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेमध्ये एफडीवर (fincare small finance bank FD Rates) तुम्ही ९.१५ टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळवू शकता. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेद्वारे एफडीवर दिलं जाणारं व्याज स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि एचडीएफसी (HDFC) बँक यांसारख्या मोठ्या बँकांपेक्षा खूप जास्त आहे.फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या वेबसाइटनुसार, बँक सामान्य ग्राहकांना ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीच्या एफडीवर २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर २ टक्के ते ८.५१ टक्के व्याज देत आहे. तर, ते ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ३.६० टक्के ते ९.१५ टक्के व्याज देत आहे.हे आहे व्याजफिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ७ ते १४ दिवसांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर २ टक्के, १५ दिवस ते ३० दिवसांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ४.५० टक्के आणि ३१ दिवस ते ४५ दिवसांच्या एफडीवर ४.७५ टक्के वार्षिक दरानं व्याज देत आहे. ग्राहकांना ४६ ते ९० दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ५.२५ टक्के व्याज, ९१ ते १८० दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ५.७५ टक्के व्याज आणि १८१ ते ३६५ दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ६.५० टक्के व्याज देत आहे.
त्याचप्रमाणे, बँक ३० महिने आणि एक दिवस ते ९९९ दिवसांच्या मुदतीच्या एफडीसाठी साठी ८ टक्के व्याज देत आहे. ३६ महिने आणि एक दिवस ते ४२ महिन्यांच्या कालावधीतील एफडीसाठी ८.५१ टक्के, ४२ महिने आणि एक दिवस ते ५९ महिन्यांच्या मुदतीच्या बँक एफडीवर ७.५० टक्के व्याज देत आहे. सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना सर्व कालावधीच्या एफडीवर ५० बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळत आहे.