नवी दिल्ली : कुठलीही माहिती शोधण्यासाठी आपण ‘गूगल’चा उपयोग करतो. हेच ‘गूगल’ आता नोकरीही शोधून देत आहे. खास भारतीय तरुणांसाठी गूगलने हे ‘जॉब सर्च’ इंजिन आणले आहे.स्मार्ट फोनमुळे ‘गूगल’ प्रत्येकाची गरज झाले आहे. हवी ती माहिती काही सेकंदात गूगलद्वारे उपलब्ध होते. याच गूगलवर आता नोकरीची माहितीही काही सेकंदातच शोधता येते. ‘गूगल’च्या टूल बारमध्ये ‘गुगल जॉब्स’ असा सर्च देताच नोकरीचे अनेक पर्याय दिसतात. अकाऊंटंटपासून ते व्यवस्थापक, डिजिटल मार्केटिंग, सीनिअर अॅनालिस्ट्स, क्लाऊड सल्लागार, भागीदार, व्यावसायिक, सॉफ्टवेअर या २१ श्रेणीतील नोकऱ्या गूगलने उपलब्ध केल्या आहेत.आपण राहत असलेल्या ठिकाणापासून २, ५, १०, ५०, १०० ते ३०० किमी अंतरावरील नोकरी शोधण्यासाठी स्वतंत्र पर्याय आहेत. तसेच देशभरात हव्या त्या ठिकाणच्या नोकरीचा शोधही घेता येतो. नोकरीचा प्रकार, कंपनी, मालक या पर्यायांद्वारेही नोकरी शोधता येते. २०२० पर्यंत भारत जगातील सर्वात तरुण देश होत आहे. तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गूगलने ही सेवा सुरू केली आहे. त्यासाठी लिंक्डइन, क्विकआर जॉब्स, शाइन डॉट कॉम, मायजॉब्स डॉट कॉम या कंपन्यांकडील नोकरीची माहिती गूगलशी संलग्न केली आहे.
गूगलवर ‘जॉब सर्च’ करताच या अन्य वेबसाइटवरील नोकरीच्या संधी युझर्सला एकाच ठिकाणी पाहता येतात. त्यासाठी त्या-त्या वेबसाइटावर जाण्याची गरज नाही, हे या सेवेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
‘गूगल जॉब सर्च’मधील अन्य वैशिष्ट्येआवडलेली नोकरी इच्छुकाला स्वत:साठी सेव्ह करता येतेहव्या असलेल्या नोकरीसाठी अलर्ट लावता येतोनोकरी ज्या वेबसाइटवर आली आहे, त्यावर थेट अर्ज करता येतोअर्ज गूगल लॉग इनद्वारेच, स्वतंत्र खाते उघडण्याची गरज नाहीनोकरीची माहिती अर्जासह फेसबूक, ई-मेल, टिष्ट्वटवर पाठवता येते