Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेल कंपन्यांच्या मालमत्ता शोधा, केंद्राचे राज्य सरकारांना आदेश

शेल कंपन्यांच्या मालमत्ता शोधा, केंद्राचे राज्य सरकारांना आदेश

नवी दिल्ली : मान्यता रद्द करण्यात आलेल्या २.१ लाख शेल कंपन्यांच्या मालमत्ता हुडकून काढा, तसेच या मालमत्तांचे कोणत्याही प्रकारचे व्यवहार यापुढे होणार नाहीत, याची खबरदारी घ्या, असे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 05:04 AM2017-10-28T05:04:07+5:302017-10-28T05:04:24+5:30

नवी दिल्ली : मान्यता रद्द करण्यात आलेल्या २.१ लाख शेल कंपन्यांच्या मालमत्ता हुडकून काढा, तसेच या मालमत्तांचे कोणत्याही प्रकारचे व्यवहार यापुढे होणार नाहीत, याची खबरदारी घ्या, असे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत.

Find Shell Companies Assets, Center Orders to State Governments | शेल कंपन्यांच्या मालमत्ता शोधा, केंद्राचे राज्य सरकारांना आदेश

शेल कंपन्यांच्या मालमत्ता शोधा, केंद्राचे राज्य सरकारांना आदेश

नवी दिल्ली : मान्यता रद्द करण्यात आलेल्या २.१ लाख शेल कंपन्यांच्या मालमत्ता हुडकून काढा, तसेच या मालमत्तांचे कोणत्याही प्रकारचे व्यवहार यापुढे होणार नाहीत, याची खबरदारी घ्या, असे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत.
कायदा, न्याय आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी सांगितले की, या कंपन्यांच्या मालमत्ता शोधून काढण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा आणि त्याची माहिती कालबद्ध पद्धतीने कंपनी व्यवहार मंत्रालयाला कळवा, असे राज्य सरकारांना सांगण्यात आले आहे.
कंपनी कायद्यांतर्गत मान्यता रद्द करण्यात आलेल्या कंपन्यांवरील कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी चौधरी यांनी एक बैठक घेतली. त्याप्रसंगी त्यांनी वरील वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, देशभरातील जमिनींचे रेकॉर्ड आता संगणकीकृत करण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांच्या मालमत्तांची माहिती जिल्हा प्रशासनास तसेच केंद्र सरकारास कळविण्यास फार वेळ लागणार नाही. चौधरी यांनी राज्यांच्या प्रतिनिधींना सांगितले की, या कंपन्यांची मान्यता कंपनी निबंधकांनी रद्द केली आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या वतीने कोणा संचालकाच्या अथवा स्वाक्षरी अधिकारप्राप्त व्यक्तीच्या नावे मालमत्ता असल्यास अशा मालमत्ता बेकायदेशीर ठरतात. एनसीएलटी जोपर्यंत त्यांची वैधता ठरवीत नाही, तोपर्यंत त्या बेकायदेशीर राहतील.
चौधरी म्हणाले की, काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांत शेल कंपन्यांवरील कारवाई महत्त्वपूर्ण आहे. काळ्या पैशांविरोधातील लढा अनेक पातळ्यांवर लढला जावा, असे अपेक्षित आहे. त्यात राज्य सरकारांनीही आपला वाटा उचलावा.
कुठल्याही प्रकारचा व्यवसाय न करणाºया कंपन्यांना शेल कंपन्या असे म्हटले जाते. या कंपन्या केवळ कागदोपत्री अस्तित्वात असतात, त्यांचा वापर प्रामुख्याने काळा पैसा पांढरा करण्यासाठी करण्यात येतो. मनी लाँड्रिंगच्या व्यवहारात या कंपन्यांचा मुख्य सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर सरकारने अशा प्रकारच्या २.१ लाख शेल कंपन्यांवर कारवाई करीत त्यांची नोंदणी रद्द केली. कारवाईचा पुढचा भाग म्हणून आता त्यांची मालमत्ता हुडकण्यात येत आहे. ही मालमत्ता नंतर जप्त करण्यात येईल, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
>व्यवहार झाल्यास अधिकाºयांवर कारवाई करा
चौधरी यांनी राज्यांना कळविले की, शेल कंपन्यांची मान्यताच रद्द करण्यात आल्यामुळे या कंपन्यांचे अस्तित्व संपले आहे. अस्तित्वात नसलेल्या कोणत्याही संस्थेच्या मालमत्तांचे अस्तित्वही आपोआपच संपते. अशा कंपन्यांच्या नावे असलेल्या मालमत्तांचे कोणतेही व्यवहार होणार नाहीत, हे पाहण्याची जबाबदारी आता जिल्हा प्रशासनांची आहे.राज्य सरकारांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात. अशा मालमत्तांचे व्यवहारच होणार नाहीत, अशी व्यवस्था निबंधक कार्यालयात करण्यात यावी. अशा मालमत्तांचे रजिस्ट्रीसारखे व्यवहार झाल्यास संबंधित अधिकाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

Web Title: Find Shell Companies Assets, Center Orders to State Governments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.