Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा समूहाने 'ही' कंपनी विकली! आता ऑस्ट्रेलियातील फिंदी कंपनी बनली मालक

टाटा समूहाने 'ही' कंपनी विकली! आता ऑस्ट्रेलियातील फिंदी कंपनी बनली मालक

Tata Communications Payment Solutions Limited Findipay: टाटा समूहाची मालकी असलेली tata communications payment solutions limited ही कंपनी ऑस्ट्रेलियातील कंपनीने विकत घेतली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:38 IST2025-03-01T16:37:34+5:302025-03-01T16:38:58+5:30

Tata Communications Payment Solutions Limited Findipay: टाटा समूहाची मालकी असलेली tata communications payment solutions limited ही कंपनी ऑस्ट्रेलियातील कंपनीने विकत घेतली आहे. 

Findipay buy Tata Communications Payment Solutions Limited ownership | टाटा समूहाने 'ही' कंपनी विकली! आता ऑस्ट्रेलियातील फिंदी कंपनी बनली मालक

टाटा समूहाने 'ही' कंपनी विकली! आता ऑस्ट्रेलियातील फिंदी कंपनी बनली मालक

TCPSL findipay Deal: टाटा समूहाच्या टाटा कम्युनिकेशन्सने शंभर टक्के मालकी असलेली टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन लिमिटेड (tata communications payment solutions limited) ऑस्ट्रेलियातील कंपनीला विकली आहे. आता ऑस्ट्रेलियातील FindiPay ही कंपनी भारतीय शाखेच्या माध्यमातून या कंपनीचा कारभार बघणार आहे. हा व्यवहार २८ फेब्रुवारी २०२५ रोजी पूर्ण झाला. संयुक्त निवेदन जारी करत याची माहिती देण्यात आली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या टीसीपीएसएलची मालकी ऑस्ट्रेलियातील डिजिटल पेमेंट आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी फिंदीच्या भारतीय शाखा ट्रान्सजॅक्शन सॉल्युशन इंटरनॅशनल प्रा.लि.ने खरेदी केली आहे. सर्व नियमांचं पालन करून २८ फेब्रुवारी २०२५ रोजी व्यवहार पूर्ण करण्यात आल्याचे निवेदनातून जाहीर करण्यात आले आहे. 

टाटाने टीसीपीएसएल कंपनी का विकली?

टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा कम्युनिकेशन्सने आता नेटवर्क, क्लाउड, सायबर सिक्युरिटी आणि मीडिया सर्व्हिसेस या त्यांच्या मुख्य व्यवसायांवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. 

कंपनीचे म्हणणे आहे की, या क्षेत्रामध्ये चांगली वृद्धी होत आहे आणि या क्षेत्रातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. त्याच कारणामुळे टाटा कम्युनिकेशनने ही कंपनी विकली आहे. 

टाटा कम्युनिकेशनचे सीएफओ कबीर अहमद शाकीर या व्यवहाराबद्दल म्हणाले की, 'हा व्यवहार आमचा व्यवसाय अधिक जास्त मजबूत करण्यात करण्यात आला आहे. आम्हाला त्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करायची आहे, ज्यामध्ये भविष्यात जास्त परताव्याच्या शक्यता आहे. 

ऑस्ट्रेलियातील कंपनीने का घेतली मालकी?

टाटा कंपनीने विकलेली ही कंपनी ऑस्ट्रेलियाच्या टीएसआयने का खरेदी केली, तर याचं महत्त्वाचे कारण कंपनीला होणारा फायदा. फिंदी कंपनीला देशभरात ४६०० एटीएम असलेले एक मोठे नेटवर्क मिळणार आहे. त्याचबरोबर एटीएम प्लॅटफॉर्म आणि पेमेंट स्वीच सारख्या तंत्रज्ञान वापराची परवानगी मिळणार आहे. 

या डीलमुळे फिंदीच्या १.८ लाखपेक्षा जास्त व्यापाऱ्यांच्या नेटवर्कमध्ये एटीएम लावण्यात मदत करणार आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ दीपक वर्मा यांनी या व्यवहाराबद्दल बोलताना सांगितले की, हा व्यवहार आम्हाला भारतातील त्या लोकांपर्यंत पोहोचायला मदत करणार आहे, ज्यांच्याकडे मर्यादित बँकिंग सुविधा आहेत. 

Web Title: Findipay buy Tata Communications Payment Solutions Limited ownership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.