Join us  

'आधार'साठी घरबसल्या करा फिंगरप्रिंट! यूआयडीएआय आणि आयआयटी मुंबईचा करार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 10:29 AM

कोठूनही, कधीही फिंगरप्रिंट प्रमाणीकरण करता येईल.

नवी दिल्ली :

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) आणि आयआयटी मुंबईने टचलेस बायोमेट्रिक कॅप्चर सिस्टीम विकसित करण्यासाठी करार केला आहे, ज्यामुळे कोठूनही, कधीही फिंगरप्रिंट प्रमाणीकरण करता येईल.

टचलेस बायोमेट्रिक कॅप्चर प्रणाली विकसित केल्यानंतर, फिंगरप्रिंट प्रमाणीकरण घरबसल्या शक्य होणार आहे. नवीन प्रणाली एकाच वेळी फिंगरप्रिंट्स कॅप्चर करेल आणि प्रमाणीकरण यशस्वी करेल.

आयटी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यूआयडीएआय आणि आआयटी मुंबई फिंगरप्रिंटसाठी मोबाइल कॅप्चर सीस्टिमसह एकात्मिक लाइव्हनेस मॉडेल तयार करण्यासाठी संशोधन करतील. नवीन प्रणाली आधार प्रमाणीकरण अधिक मजबूत, सोपे व सुरक्षित करेल.

ऑथेंटिकेटरच्या दिशेने मोठे पाऊल- ही प्रणाली युनिव्हर्सल ऑथेंटिकेटर बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असेल. आयआयटी आपल्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंटरनल सिक्युरिटी टेक्नॉलॉजी (एनसीईटीआयएस)च्या मदतीने यूआयडीएआयसोबत या प्रकल्पावर काम करेल. - या प्रकल्पाचे नेतृत्व यूआयडीएआय करणार आहे, जे आधार प्रणालीच्या विकासासाठी सतत संशोधन आणि विकासावर काम करत आहे.एआय-एमएल आधारित सुरक्षा प्रणालीयूआयडीएआयने अलीकडेच फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन आणि स्पुफिंग प्रयत्न जलद शोधण्यासाठी एक नवीन सुरक्षा यंत्रणा सादर केली आहे. हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग (एआय-एमएल)च्या आधारे विकसित केले गेले आहे. फिंगरप्रिंटची सजीवता तपासण्यासाठी ते फिंगर मिन्युटीया व फिंगर इमेज या दोन्ही गोष्टींचा वापर करेल.

टॅग्स :आधार कार्ड