मुंबई : आग लागल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक यंत्राची गरज असते. आता मात्र अशा यंत्राची गरज नाही. साधारण फुटबॉलच्या आकाराचा एक चेंडूच आग लागताच अवघ्या पाच सेकंदांत फुटेल व आगीवर नियंत्रण मिळवेल. आजवर केवळ चीन आणि थायलंडमध्ये तयार होणारा हा चेंडू आता ‘मेक इन इंडिया’अंतर्गत स्टार्ट अप योजनेतून भारतातच तयार होत आहे.
कमला मिल कम्पाउंडमधील आग असो वा अन्य कार्यालय किंवा रेस्टॉरंट, दुकानात लागलेल्या आगी, त्यामध्ये प्रामुख्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास झालेल्या विलंबामुळे नुकसान होते. वाढत्या कॉर्पोरेट संस्कृतीमध्ये सर्वच कार्यालये ही अत्याधुनिक नेटवर्क प्रणालीने सज्ज असतात. संगणक प्रणालींना जोडण्यासाठी विविध प्रकारच्या वायरिंग्सचे जाळे, डेटा सेंटरसोबतच
वातानुकूलित यंत्रणांनी सज्ज कार्यालये उभी असतात. अशा प्रकारच्या अत्याधुनिककार्यालयांना आगीची भीती ही असतेच.
आग लागल्यास अग्निशाामक यंत्र आणून त्याची फवारणी करण्याइतका वेळ नसतो; अथवा
या फवारणीद्वारे आग पूर्ण
नियंत्रणात येण्याची शाश्वतीही बरेचदा नसते. यासाठीच ‘अग्निशमन चेंडू’ उपयोगी पडतो.
हा चेंडू सध्या केवळ चीन आणि थायलंडमध्ये तयार होतो. तेथून तो भारतीय बाजारात आल्यावर त्याची किंमत ६८०० रुपयांपासून ते तब्बल ९ हजार रुपये होते. आता मात्र भारतीय तरुणांनी ‘स्टार्ट अप’ अंतर्गत हा चेंडू स्वत: तयार केला आहे. रोशन मिश्रा यांनी फक्त दीड किलो वजनाचा हा चेंडू स्वत: तयार केला. आग लागल्यानंतर चेंडू फुटतो व फक्त पाच सेकंदांत आगीवर नियंत्रण मिळवतो. ब्रिजेश लोहिया यांच्या ग्लोबल ओशियन समूहातर्फे हा चेंडू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला
जाणार आहे.
असा
आहे चेंडू
फक्त दीड किलो वजन
आग लागताच फुटून पाच सेकंदांत नियंत्रण
दीड किलो वजन
पाच वर्षे टिकतो
कार्यालयाच्या छतावरही लटकवता येतो
चिनी चेंडूपेक्षा १५००
ते ४००० रुपये स्वस्त
स्वदेशी ‘चेंडू’ आणणार आगीवर नियंत्रण ; आग लागल्यानंतर पाच सेकंदांत फुटणार
आग लागल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक यंत्राची गरज असते. आता मात्र अशा यंत्राची गरज नाही. साधारण फुटबॉलच्या आकाराचा एक चेंडूच आग लागताच अवघ्या पाच सेकंदांत फुटेल व आगीवर नियंत्रण मिळवेल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:06 AM2018-02-27T01:06:40+5:302018-02-27T01:06:40+5:30