Join us

FIRE- नोकरीचे जू उतरविण्याचे सीक्रेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 10:19 AM

FIRE: ‘फायर’ (फायनान्शिअल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली) ही संकल्पना आता हळूहळू जगभर जोर धरते आहे. पण तरुणपणीच रिटायर व्हायचं असेल, तर केवळ आपल्याला आयुष्याचीच नव्हे, तर आर्थिक आणि गुंतवणुकीचीही शिस्त लावावी लागते.

कशासाठी आयुष्यभर ‘मरमर’ करायची? त्यापेक्षा तरुणपणीच जे आणि जेवढं काही कमवायचं असेल तेवढं कमवून घ्यायचं आणि तरुणपणीच रिटायर व्हायचं, आयुष्याच्या संध्याकाळची तजवीज आत्ताच करून घ्यायची, यासंदर्भातला मजकूर गेल्या अंकात आपण वाचला. त्यासंदर्भाची ‘फायर’ (फायनान्शिअल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली) ही संकल्पना आता हळूहळू जगभर जोर धरते आहे. पण तरुणपणीच रिटायर व्हायचं असेल, तर केवळ आपल्याला आयुष्याचीच नव्हे, तर आर्थिक आणि गुंतवणुकीचीही शिस्त लावावी लागते. अनेक गोष्टी काटेकाेरपणे पाळाव्या लागतात. त्या तत्त्वांना चिकटून राहावं लागतं, तरच तरुणपणी रिटायर व्हायचं आपलं स्वप्न पूर्णत्वाला जाऊ शकतं. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. १ - आपल्याला आत्ता तरुणपणी साधारणपणे किती पैसा पुरेसा होईल आणि रिटायरमेंटनंतर किती पैसा लागेल याचा किमान ढोबळ अंदाज आपल्याला काढावा लागेल.२ - आपल्याला किती पैसे हवेत हे अर्थातच प्रत्येक व्यक्तीप्रमाणे आणि त्याच्या प्राधान्यक्रमानुसार बदलेल, पण भविष्यातल्या महागाईचा विचारही त्यात समाविष्ट करावाच लागेल. ३ - भविष्यातील आपलं हे स्वप्न पूर्ण करायचं तर त्यासाठी आत्ता तुम्ही वर्षाला जेवढी रक्कम कमावता त्याच्या किमान तीस पट रक्कम तरी तुमच्या हातात असली पाहिजे, म्हणजे तुम्ही हा निर्णय घेऊ शकता, असं मानलं जातं. ४ - अमेरिकन राहणीमानाच्या अंदाजानुसार तुमच्या कमाईच्या तीस पट रक्कम किंवा किमान दहा लाख डॉलर्स आत्ता या क्षणी तुमच्या हातात हवेत, म्हणजे तुम्ही तुमच्या कामातून रिटायरमेंट घेऊ शकाल.५ - रिटायरमेंट घेतल्यानंतर तुम्हाला तुमची लाइफस्टाइल मेंटेन करायची असेल, तर आपल्या शिल्लक रकमेतून दरवर्षी आपल्या गरजेप्रमाणे जास्तीत जास्त तीन ते चार टक्के रक्कम तुम्ही काढू शकता. ६ - अर्थातच तुम्ही आपल्या कमाईतल्या कमीत कमी ७० टक्के रकमेची बचत केली पाहिजे. शिवाय नुसती बचत करून उपयोग नाही. ही रक्कम वाढतही राहिली पाहिजे याचीही तजवीज तुम्हाला करावी लागेल. ‘फायर’मध्येही काही पर्याय आहेतच. त्याविषयी पाहूया पुढच्या भागात..

टॅग्स :नोकरीकर्मचारी