भोपाळ : मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात असलेल्या हातूपूर हिरा खजिन पट्ट्याचा ई-लिलाव झाला. लिलाव झालेली ही हिऱ्याची पहिलीच खाण ठरली आहे. या खाणीत १0६ कोटी किमतीच्या हिऱ्यांच्या खनिजाचा साठा आहे.
मध्य प्रदेशचे खनिज संपत्ती सचिव मनोहर दुबे यांनी ही माहिती जारी केली. त्यांनी सांगितले की, १२ जानेवारी २0१५ पासून लागू करण्यात आलेल्या खाण आणि खनिज (विकास आणि नियंत्रण) अधिनियम १९५७ मधील तरतुदीनुसार काल पारदर्शक पद्धतीने ई-लिलाव पार पाडण्यात आला. त्यात बन्सल कन्स्ट्रक्श्न वर्क्स प्रा. लि. कंपनीने सर्वाधिक बोली लावली. या लिलावात रुंगटा माइन्स लिमिटेड, त्रिवेणी अर्थमुव्हर्स, पुष्पांजली ट्रेडविन आणि बन्सल कन्स्ट्रक्शन वर्क्स या कंपन्यांनी भाग घेतला.
दुबे यांनी सांगितले की, हातूपूर खनिज पट्टा १३३.५0 हेक्टर क्षेत्रावर पसरलेला आहे. या क्षेत्रात १0६ कोटी रुपये किमतीचा हीरा खनिज साठा असावा, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर १0६ कोटी रुपये मूल्यांपेक्षा २२.३१ टक्के अधिकची बोली प्राप्त झाली आहे. याचाच अर्थ बोलीकर्ता कंपनी खनिजाच्या रॉयल्टी बरोबरच हिऱ्याच्या मूल्यापोटी २२.३१ टक्के रक्कम सरकारला भागिदारीच्या स्वरूपात देईल. खनिजाच्या उत्खनन काळात कंपनी ११ कोटींची रॉयल्टी सरकारा देईल. तसेच भागीदारीपोटी अतिरिक्त २५ कोटी रुपये भाडेपट्ट्याच्या कालावधीत देईल.
हिरे खाणीचा पहिला लिलाव मध्य प्रदेशात
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात असलेल्या हातूपूर हिरा खजिन पट्ट्याचा ई-लिलाव झाला.
By admin | Published: October 8, 2016 03:51 AM2016-10-08T03:51:35+5:302016-10-08T03:51:35+5:30