Lokmat Money > बिझनेस न्यूज > पहिला बिझनेस फेल, मग मिळाली अशी आयडिया, आता या दोन तरुणांनी उभी केली ४० हजार कोटींची कंपनी

पहिला बिझनेस फेल, मग मिळाली अशी आयडिया, आता या दोन तरुणांनी उभी केली ४० हजार कोटींची कंपनी

Meesho Online Shopping: गेल्या काही काळापासून देशात स्टार्टअप कल्चर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच अनेक युवा उद्योजक या क्षेत्रामध्ये आपही छाप पाडत आहेत. या तरुण उद्योजकांना देशातूनच नाही तर परदेशातूनही निधी मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 07:03 PM2023-04-11T19:03:16+5:302023-04-11T19:04:43+5:30

Meesho Online Shopping: गेल्या काही काळापासून देशात स्टार्टअप कल्चर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच अनेक युवा उद्योजक या क्षेत्रामध्ये आपही छाप पाडत आहेत. या तरुण उद्योजकांना देशातूनच नाही तर परदेशातूनही निधी मिळत आहे.

First business failed, then got an idea, now these two young men have set up a company worth 40 thousand crores | पहिला बिझनेस फेल, मग मिळाली अशी आयडिया, आता या दोन तरुणांनी उभी केली ४० हजार कोटींची कंपनी

पहिला बिझनेस फेल, मग मिळाली अशी आयडिया, आता या दोन तरुणांनी उभी केली ४० हजार कोटींची कंपनी

गेल्या काही काळापासून देशात स्टार्टअप कल्चर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच अनेक युवा उद्योजक या क्षेत्रामध्ये आपही छाप पाडत आहेत. या तरुण उद्योजकांना देशातूनच नाही तर परदेशातूनही निधी मिळत आहे. विनित आत्रेय आणि संजीव बरनवाल यांच्यासारख्या तरुण उद्योजकांचा या यादीमध्ये समावेश आहे. आयआयटी दिल्लीमधून हे दोन्ही माजी विद्यार्थी असून, त्यांनी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म मिशोची सुरुवात केली आहे. ग्रॅज्युएट झाल्यानंतर काही वर्षांनंतर त्यांनी हायपरलोकल, ऑन-डिमांड फॅशन मार्केटप्रेस सुरू केली.

मात्र त्यांचा पहिला स्टार्टअप अपयशी ठरला होता, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. मात्र त्यातून या दोघांना खूप काही शिकायला मिळाले. देशात छोटे व्यावसायिक आपले प्रॉडक्ट विकण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत, मात्र त्यांना फारसं यश मिळत नाही आहे, हे त्यांना दिसून आलं. हीच बाब विचारात घेऊन विदित आणि संजीव यांना मीशो सुरू करण्याची कल्पना सूचली.

देशामध्ये अनेकजण आणि छोटे व्यावसायिक आपले प्रॉडक्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक आणि व्हॉट्स अॅप यांच्या माध्यमातून विकतात. मर्यादित अवाक्यामुळे त्यांचे उत्पादन फार मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचत नाहीत. सोशल मीडियावरील बिझनेसशी संबधित या समस्येला आणि मर्यादेला ओळखून, विदित आणि संजीव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान विकणाऱ्या व्यापाऱ्यांना अधिक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी २०१५ मध्ये मीशोची स्थापना करण्यात आली.

मीशो एका वैशिष्ट्यपूर्ण मॉडेलवर काम करते. तिथे विक्रेत्याला अॅपवर मार्केट प्लेस बनवण्याची संधी मिळते. ते आपल्या फेसबूक पेजला मीशोसोबत लिंक करतात. तसेच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद साधतात. मीशो डिलिव्हरीवर लक्ष ठेवते आणि विक्रेत्यांकडून कमिशन घेऊन उत्पन्न मिळवते. कुणीही व्यक्ती आपलं अकाऊंट मिशोसोबत रजिस्टर करू शकते. त्यानंतर ते मीशो अॅपवर उपलब्ध प्रॉ़डक्टची लिंक जनरेट करू शकते.  

Web Title: First business failed, then got an idea, now these two young men have set up a company worth 40 thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.