दोन दिवसांपूर्वीच मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) या कंपनीचा आयपीओनं जबरदस्त एन्ट्री घेतली होती. मात्र आज त्याच कंपनीच्या दिल्लीतील कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाची धाड पडली. या वृत्तानंतर मॅनकाइंड फार्माच्या शेअर्समध्ये घसरण झाली. कामकाजादरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती.
कामकाजादरम्यान, कंपनीच्या शेअर्समध्ये रिकव्हरीही दिसून आली. कामाकाजाच्या अखेरच्या सत्रात कंपनीचे शेअर्स ०.६४ टक्क्यांच्या घसरणीसह १३७४ रुपयांवर बंद झाले. १०८० रुपयांच्या फेसव्हॅल्यूवर गुंतवणूकदारांना हे शेअर्स जारी करण्यात आली होती. जबरदस्त लिस्टिंगनंतर कंपनीचे शेअर्स दोनच दिवसांत १४३१ रुपयांवर पोहोचले. होते. गुंतवणूकदारांना तब्बल ३२ टक्क्यांचा नफा झाला होता.
गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद
मॅनकाइंड फार्माच्या ४३२६ कोटी रूपयांच्या ऑफर फॉर सेलच्या इश्यूला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा ०.९२ टक्केच सबस्क्राईब झाला होता. तर क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सच्या जोरावर हा आयपीओ १५.३२ पट सबस्काईब झाला होता. क्युआयबीचा हिस्सा ४९.१६ पट आणि नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा ३.८० टक्के सबस्क्राईब झाला होता.