मुंबई - २०२१ च्या पहिल्याच दिवशी आज शेअर बाजारामध्ये चांगलीच तेजी दिसून आली. दिवसअखेरीस शेअर बाजार तेजीसह बंद झाला. तर निफ्टीही बंद होण्यापूर्वी १४ हजारांचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरला. शुक्रवारी दिवसभराच्या कारभारात बीएसईचा सेंसेक्स ११७.६५ अंकांनी वधारून ४७ हजार ८६८.९८ च्या स्तरावर बंद झाला. तर निफ्टीसुद्धा ३६.७० अंकांनी वधारून १४ हजार १८ अंकावर बंद झाला.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी निफ्टीमध्ये अदानी पोर्ट्स, आयटीसी, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, आणि एसबीआयच्या स्टॉक्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर आयसीआयसीआय बँक, एसबीआय लाइफ इन्शोरन्स, हिंडाल्को, एचडीएफसी बँक आणि टायटन कंपनीच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.
निफ्टी बँकेला सोडून सर्व सेक्टोरल इंडेक्स हिरव्या निशाणावर बंद होण्यात यशस्वी ठरले. सर्वाधिक तेजी पीएसयू बँक आणि ऑटो इंडेक्समध्ये पाहण्यास मिळाली. बीएसईच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये ०.९ टक्क्यांपासून १.२ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली.
सेंसेक्समध्ये सर्वाधिक तेजी आयटीसीच्या शेअर्समध्ये दिसून आली. दिवसअखेर २.३ टक्क्यांच्या वाढीसह हे शेअर बंद झाले. त्यापाठोपाठ टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एसबीआयचे शेअर राहिले. टीसीएसच्या स्टॉक्समध्ये २.०२
टक्क्यांची तेजी दिसून आली.
वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी, निफ्टी १४ हजारांपार
stock market :२०२१ च्या पहिल्याच दिवशी आज शेअर बाजारामध्ये चांगलीच तेजी दिसून आली. दिवसअखेरीस शेअर बाजार तेजीसह बंद झाला.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 05:35 PM2021-01-01T17:35:47+5:302021-01-01T17:37:59+5:30