HSBC Pam Kaur : एचएसबीसी होल्डिंग्जने मंगळवारी पाम कौर यांची पहिल्या महिला वित्त प्रमुख (CFO) म्हणून नियुक्ती केली आहे. याच वर्षी त्यांची सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली होती. 'त्या बँकेच्या चार बिझनेस युनिट्सना स्ट्रीमलाइन करतील,' असं एचएसबीसीनं म्हटलं. चॅनेल न्यूज एशियानं दिलेल्या वृत्तानुसार, भूराजकीय तणावामुळे वाढलेले धोके आणि व्याजदर वाढ संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर पुनर्रचनेतून विकासाकडे जाणाऱ्या १६० वर्षीय बँकेच्या कामगिरीवर आणि सातत्य यावर लक्ष केंद्रित करण्याच्या अनुषंगानं कौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
६० वर्षीय कौर सध्या एचएसबीसीच्या चीफ रिस्क अँड कम्प्लायन्स ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. एप्रिल २०१३ मध्ये त्या बँकेत इंटरनल ऑडिटच्या ग्रुप हेड म्हणून रुजू झाल्या. कौर यांनी यापूर्वी सिटी ग्रुपच्या ग्लोबल डायरेक्टर ऑफ कंप्लायंस फॉर कन्झ्युमर बँकिंग आणि डॉयचे बँकेच्या ग्लोबल हेड ऑफ ग्रुप ऑडिटसह टॉप ग्लोबल बँकांमध्ये वरिष्ठ पदं भूषविली आहेत.
काय म्हटलं एचएसबीसीनं?
कंपनी चार वेगवेगळ्या बिझनेस लाईन्समध्ये आपल्या कामकाजाची पुनर्रचना करेल. यामध्ये हाँगकाँग, यूके, कॉर्पोरेट आणि इन्स्टिट्यूशनल बँकिंग, इंटरनॅशनल वेल्थ एंड आणि प्रीमियर बँकिंग यांचा समावेश असल्याचं एचएसबीसीनं म्हटलं. समूह आपल्या जागतिक बँकिंग आणि मार्केट बिझनेससह युके आणि हाँगकाँग वगळून आपलं कमर्शिअल बँकिंग कामकाज कन्सोलिडेट करत आहे.