Lokmat Money > बिझनेस न्यूज > पहिल्या सहामाहीत सरकार करणार ३.७२ निखर्व रुपयांची उसनवारी

पहिल्या सहामाहीत सरकार करणार ३.७२ निखर्व रुपयांची उसनवारी

२0१६-१७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारत सरकार ३.७२ निखर्व

By admin | Published: March 30, 2017 01:01 AM2017-03-30T01:01:57+5:302017-03-30T01:01:57+5:30

२0१६-१७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारत सरकार ३.७२ निखर्व

In the first half of the year, the government will have to pay 3.72 lakh rupees | पहिल्या सहामाहीत सरकार करणार ३.७२ निखर्व रुपयांची उसनवारी

पहिल्या सहामाहीत सरकार करणार ३.७२ निखर्व रुपयांची उसनवारी

नवी दिल्ली : २0१६-१७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारत सरकार ३.७२ निखर्व (एक निखर्व म्हणजे एक हजार अब्ज) रुपयांची उसनवारी करणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने म्हटले की, हा पैसा सरकार भांडवली बाजारातून उभा करणार आहे. संस्था आणि किरकोळ गुंतवणूकदारांना आपले गुंतवणुकीचे नियोजन करता यावे यासाठी, त्याच प्रमाणे सरकारी रोखे बाजारास स्थैर्य आणि पारदर्शकता मिळवून द्यावी यासाठी रिझर्व्ह बँकेने सरकारशी सल्ला मसलत करून एक सांकेतिक कॅलेंडर तयार केले आहे.
बाजारातून भांडवल उभारण्याचा शुभारंभ ३ एप्रिलपासून होईल. चार वेगवेगळ््या परिपक्वतेचे चार रोखे बाजारात उतरविले जातील. त्यांची एकत्रित किंमत १५ हजार कोटी रुपये असेल. आगामी सहा महिन्यांपर्यंत सरकार बाजारातून ही उसनवारी करील. या काळात टप्प्या-टप्प्याने रोखे बाजारात उतरविले जातील. प्रत्येक टप्प्यातील रोख्यांची किंमत १५ हजार कोटी ते १८ हजार कोटी रुपये असेल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, २0१८ च्या अर्थसंकल्पात एकूण ५.८ निखर्व रुपयांची उसनवारी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विना स्पर्धा पद्धतीने रोख्यांची विक्री केली जाईल. त्यातील पाच टक्के रोखे छोट्या गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील. ठरविण्यात आलेल्या रोखे उभारणी कॅलेंडरमध्ये लवचिकता राखली जाईल. निर्दिष्ट रक्कम, रोखे जारी करण्याचा काळ, परिपक्वता याबाबतीत ही लवचिकता असेल. गरजेनुसार या बाबी ठरविल्या जातील. याशिवाय ट्रेझरी बिल्सच्या माध्यमातून १.८२ निखर्व रुपये उभे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एप्रिल ते जून २0१७ या काळात ते जारी होतील. एक वर्षाच्या आतील मुदतीचे हे बिल्स असतील.

नेपाळची अर्थव्यवस्था ६.२ टक्क्यांनी वाढणार
२0१६-१७ या आर्थिक वर्षात नेपाळची अर्थव्यवस्था ६.२ टक्क्यांनी वाढेल, असे आशियाई विकास बँकेने (एडीबी) म्हटले आहे. चीनची वृत्तसंस्था झिन्हुआने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, यंदा नेपाळात शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

भूकंपानंतर बांधकाम क्षेत्रानेही गती घेतली आहे. याशिवाय गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून नेपाळची अर्थव्यवस्था झपाट्याने वृद्धी नोंदवीत आहे.

Web Title: In the first half of the year, the government will have to pay 3.72 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.