नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी रिलायन्स जियोने नवे रेकॉर्ड केले असून, एकाच महिन्यात या कंपनीने नवे एक कोटी साठ लाख ग्राहक जोडले आहेत. हे जागतिक रेकॉर्ड असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
एवढ्या गतीने ग्राहक जोडण्यात कंपनीने फेसबुक आणि व्हॉट्सअॅपलाही मागे टाकले असल्याचे म्हटले आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स जियोने ४ जी सेवेने ही नवी योजना ५ सप्टेबर रोजी सुरू केली. पहिल्या २६ दिवसांतच कंपनीने नवे एक कोटी ६० लाख ग्राहक जोडले आहेत.
याबाबत मुकेश अंबानी यांनी आनंद व्यक्त करताना म्हटले आहे की, आमच्या योजनांचा नागरिक पूर्णपणे वापर करत आहेत. डेटाच्या ताकदीतून प्रत्येक भारतीयाला सशक्त बनविणे हा उद्देश आहे. जियोची सद्या वेलकम आॅफर सुरू असून, ती डिसेंबरपर्यंत आहे. कंपनीने आगामी काळात दहा कोटी ग्राहकांचे लक्ष्य ठेवले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जियोचे पहिल्याच महिन्यात दीड कोटी ग्राहक
दूरसंचार कंपनी रिलायन्स जियोने नवे रेकॉर्ड केले असून, एकाच महिन्यात या कंपनीने नवे एक कोटी साठ लाख ग्राहक जोडले आहेत
By admin | Published: October 10, 2016 04:49 AM2016-10-10T04:49:10+5:302016-10-10T04:49:10+5:30