Join us

इन्टेक्स बनली पहिल्या क्रमांकाची मोबाईल कंपनी

By admin | Published: November 27, 2015 12:03 AM

मोबाइल उत्पादन आणि विक्री क्षेत्रात इन्टेक्सने जोरदार मुसंडी मारली आहे. आयडीसी क्यू३, २०१५ च्या अहवालानुसार गेल्या तिमाहीत

मुंबई : मोबाइल उत्पादन आणि विक्री क्षेत्रात इन्टेक्सने जोरदार मुसंडी मारली आहे. आयडीसी क्यू३, २०१५ च्या अहवालानुसार गेल्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर २०१५) इन्टेक्स टेक्नोलॉजी ही भारतीय बाजारातील पहिल्या क्रमांकाची भारतीय मोबाइल कंपनी ठरली आहे.गेल्या तिमाहीत कंपनीने तब्बल ८७,५५,६९७ मोबाईल फोनची विक्री केली आहे. आधीच्या तिमाहीत झालेल्या विक्रीच्या तुलनेत या तिमाहीतील विक्रीत ४२.५ टक्के वाढ झाली आहे. इन्टेक्सने अवघ्या दोन वर्षांच्या काळात ही मजल मारली आहे.देशातील पहिल्या क्रमांकाची मोबाइल कंपनी होणे हा, आमच्या ग्राहकांना उत्तम दर्जाचे उत्पादन देण्याच्या आमच्या ग्वाहीचा पुनरुच्चार आहे. यापुढेही आम्ही बाजारात आघाडीवर राहू, असा विश्वास इन्टेक्स टेक्नोलॉजीचे मोबाइल व्यापार प्रमुख संजय कुमार कालिरोना यांनी व्यक्त केला.या वर्षाच्या पूर्वार्धात इन्टेक्सने अक्वा पॉवर प्लस, अक्वा ४जी प्लस, अक्वा ट्रेन्ड, अक्वा ड्रीम २, क्वाऊड स्वीफ्ट अशी अनेक उत्पादने बाजारात आणली. कंपनीची सध्याची वार्षिक उलाढाल ४ हजार कोटी रुपये आहे.