Lokmat Money > बिझनेस न्यूज > इतिहासात पहिल्यांदाच BSE नंतर NSE मध्ये लिस्टेट कंपन्यांचं मार्केट कॅप ३ ट्रिलियन डॉलर्सवर

इतिहासात पहिल्यांदाच BSE नंतर NSE मध्ये लिस्टेट कंपन्यांचं मार्केट कॅप ३ ट्रिलियन डॉलर्सवर

Share Market : गुरुवारी एनएसईने स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांमध्ये झाली मोठी वाढ.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 02:29 PM2021-05-27T14:29:31+5:302021-05-27T14:31:41+5:30

Share Market : गुरुवारी एनएसईने स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांमध्ये झाली मोठी वाढ.

first time in history the market cap of companies listed on the nse after bse is at 3 trillion dollar share market | इतिहासात पहिल्यांदाच BSE नंतर NSE मध्ये लिस्टेट कंपन्यांचं मार्केट कॅप ३ ट्रिलियन डॉलर्सवर

इतिहासात पहिल्यांदाच BSE नंतर NSE मध्ये लिस्टेट कंपन्यांचं मार्केट कॅप ३ ट्रिलियन डॉलर्सवर

Highlightsगुरुवारी एनएसईने स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांमध्ये झाली मोठी वाढ.निफ्टी मिडकॅप आपल्या ५२ आठवड्यांच्या निचांकी स्तरापेक्षा ९७ टक्के वाढला.

इतिहासात प्रथमच BSE नंतर NSE वर सूचीबद्ध कंपन्यांची मार्केट कॅप ३ ट्रिलियन डॉलरचा टप्पा (सुमारे २१७ लाख कोटी रुपये) ओलांडला आहे. गुरुवारी एनएसईने स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांच्या जबरदस्त वाढीमुळे हे स्थान गाठले. जाणकारांच्या मते निफ्टी आणि सेन्सेक्सच्या मध्यापासूनच मिडकॅप आणि स्मॉलकॅप सेगमेंटमध्ये लिक्विडिटी वाढली आहे.

याशिवाय सर्वाधिक स्टॉक्सची व्हॅल्यू अधिक असल्यानं गुंतवणूकदारांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅपकडे वळण्यास सुरूवात केली. निफ्टी मिडकॅप आपल्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरापेक्षा ९७ टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप १३४ टक्के, तसंच निफ्टी ५०० ७० टक्क्यांनी वाढला आहे. यापूर्वी २१ मे रोजी बीएसईनं हा टप्पा गाठला होता. 

बुधवारी शेअर बाजारानं तीन महिन्यांमध्ये पहिल्यांदाच ५१ हजारांचा टप्पा पार केला. तर निफ्टी आपल्या विक्रमी अंकांच्या जवळ पोहोचला. सध्या देशात कोरोनाबाधितांची कमी होत असलेली संख्या आणि लसीकरणासारख्या बाबींमुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा शेअर बाजाराकडे वळताना दिसत आहेत. याशिवाय अपेक्षेपेक्षा उत्तम मार्च तिमाहिची आकडेवारी आणि कंपन्यांच्या स्थितीमुळे गुंतवणूकदारांचं सेंटिमेंट कायम आहे. राष्ट्रीय लॉकडाऊन आणि लसींतची उपलब्धता, तसंच उद्योग, बांधकाम आणि पायाभूत सुविधांसारख्या कामांशिवायही पुरवठा साखळीच्या धीम्या गतीमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. 
 

Web Title: first time in history the market cap of companies listed on the nse after bse is at 3 trillion dollar share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.